IPL 2024: गुजरातचा पराभव करून विजयी मार्गावर परतलेली दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) शनिवारी (२७ एप्रिल २०२४) त्यांच्या घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सशी (Mumbai Indians) भिडणार आहे. ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वाखाली दिल्लीने या हंगामात आतापर्यंत ९ सामने खेळले आहे. यातील दिल्लीने चार सामने जिंकले आहेत. तर, पाच सामन्यात पराभव स्वीकारला आहे. तर, दुसरीकडे मुंबईची अवस्था आणखी बिकट आहे. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) संघाला आठपैकी फक्त तीन सामन्यात विजयाची चव चाखता आली. दरम्यान, दिल्ली आणि मुंबई यांच्यातील लाईव्ह सामना कधी आणि कुठे पाहता येईल, याबाबत जाणून घेऊ.
दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात शनिवारी (२६ एप्रिल २०२४) आयपीएलमधील ४३ वा सामना खेळला जाईल. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, दिल्ली आणि मुंबई यांच्यातील सामना दुपारी ३.३० वाजता सुरु होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय, https://marathi.hindustantimes.com वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.
पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अक्षर पटेल, शाई होप, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकिपर), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार, ललित यादव, प्रवीण दुबे, रसिक दार सलाम, सुमित कुमार, कुमार कुशाग्रा, डेव्हिड वॉर्नर, यश धुल, विकी ओस्तवाल, स्वस्तिक चिकारा, झ्ये रिचर्डसन, रिकी भुई, लिझाद विल्यम्स, इशांत शर्मा, गुलबदिन नायब.
रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, मोहम्मद नबी, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा, आकाश मधवाल, नमन धीर, शम्स मुलानी, देवाल्ड ब्रेविस, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, कुमार कार्तिकेय, ल्यूक वुड, हार्विक देसाई, अर्जुन तेंडुलकर, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, क्वेना मफाका.
संबंधित बातम्या