आशिया कप 2023 वेळापत्रक
भारत आणि पाकिस्तान यांच्यात किमान २ सामने होतील, अशा दृष्टीनं आशिया चषक २०२३ चे वेळापत्रक अशा प्रकारे तयार करण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यातून भरपूर कमाई होते. याच कारणास्तव आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान दोनदा आमने-सामने यावेत, अशी तजवीज करण्यात आली आहे. नेपाळ पहिल्यांदाच आशिया कपमध्ये खेळणार आहे. यावेळी आशिया कप २०२३ मध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळचे संघ असणार आहेत. आशिया कप २०२३ च्या पूर्ण वेळापत्रकानुसार अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील एम प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल
Matches | Date | Time | Venue |
---|
बातम्या
आशिया कप वेळापत्रक 2023 FAQ
नाही, भारतीय क्रिकेट संघाचे सर्व सामने श्रीलंकेत होतील, भारतीय क्रिकेट संघ आशिया कप 2023 चा एकही सामना पाकिस्तानमध्ये खेळणार नाही.
आशिया चषक २०२३ मध्ये भारताचा पहिला सामना २ सप्टेबर रोजी पाकिस्तानविरुद्ध आहे. तर त्यानंतर ४ सप्टेंबरला टीम इंडियाचा सामना नेपाळशी होईल. यानंतर भारतीय संघ सुपर-4 मध्ये एन्ट्री करेल.
क्रिकेट आशिया कप २०२३ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात किमान दोन सामने होतील. यानंतर जर दोन्ही संघ फायनलमध्ये पोहोचले तर दोघांमध्ये एकूण ३ सामने होतील.
आशिया कप २०२३ मध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ हे ६ संघ सहभागी होणार आहेत.
आशिया कपचे केवळ ४ सामने पाकिस्तानात होणार आहेत. इतर सर्व सामने श्रीलंकेत होतील.
श्रीलंकेतील कँडी आणि कोलंबो येथे आशिया कप २०२३ सामने खेळवले जाणार आहेत.
आशिया चषक २०२२-२३ चे भारतातील प्रसारण हक्क स्टार स्पोर्ट्सकडे आहेत, तर पाकिस्तानातील प्रसारणाचे अधिकार पीटीव्ही आणि टेन स्पोर्ट्सकडे आहेत.
आशिया कप २०२३ मध्ये अ गटात पाकिस्तान, भारत आणि नेपाळ, तर ब गटात श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या संघांचा समावेश आहे.
आशिया कप २०२३ चा अंतिम सामना कोलंबो येथे खेळवण्यात येणार आहे.
आशिया कपमध्ये रोहित शर्मा भारताचा कर्णधार असणार आहे.
आशिया कप 2023 मध्ये भारतीय संघ सर्वात मजबूत मानला जात आहे. सोबतच पाकिस्तान आणि श्रीलंका हेही बलाढ्य संघ आहेत.
भारत आशिया कप २०२३ जिंकण्याची सर्वाधिक शक्यता आहे. भारताने सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकला आहे.
आशिया कप २०२३ मध्ये नेपाळचा संघ पहिल्यांदाच सहभागी होत आहे.