भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डामधील अनेक महिन्यांच्या वादानंतर आशिया चषक २०२३ स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले. पाकिस्तानच्या यजमानपदाखाली ही स्पर्धा ३० ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना पाकिस्तानात होणार आहे. आशिया चषकात एकूण १३ सामने होणार आहेत. यातील केवळ ४ सामने हे पाकिस्तानात खेळवले जातील. तर उर्वरित सामने हे श्रीलंकेच्या भूमीवर होणार आहेत. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. कारण बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवणार नसल्याची भूमिका घेतली आहे. या कारणाने केवळ ४ सामने हे पाकिस्तानमध्ये तर उर्वरित सामने हे श्रीलंकेच्या भूमीवर होणार आहेत. आशिया चषक २०२३ ही स्पर्धा ३० ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या दिवशी मुलतानमध्ये पाकिस्तान आणि नेपाळचे संघ आमने सामने असतील. यानंतर उर्वरित ३ सामने हे लाहोर येथे खेळवण्यात येणार आहेत. पाकिस्तानातील हे ४ सामने खेळल्यानंतर पुढील सर्व सामने श्रीलंकेत रंगणार आहेत. आशिया कपमधील ३ सामने कँडी येथे तर उर्वरित ६ सामने कोलंबो येथे खेळवण्यात येणार आहेत. आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला २ सप्टेंबर रोजी कँडी येथे रंगणार आहे. यानंतर सुपर फोरमध्ये देखील भारत-पाकिस्तान आमनेसामने येऊ शकतात. भारत-पाकिस्तान दुसरा सामना १० सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये होऊ शकतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यात किमान दोन सामने होतील. हायब्रीड मॉडेलमध्ये आशिया कप आयोजित करण्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) सुरुवातीला ठाम नकार दिला होता. मात्र, BCCI च्या विरोधानंतर त्यांना हायब्रीड मॉडेल मान्य करावे लागले. याच वर्षी एकदिवशीय क्रिकेट विश्वचषक (ODI CRICKET WORLD CUP 2023) होणार आहे. वनडे वर्ल्डकप भारतात होणार आहे. त्यामुळे यावेळचा आशिया कप वनडे फॉरमॅटमध्ये होत आहे. ज्या वर्षी टी-२० वर्ल्डकप होतो, त्यावेळेस आशिया कपदेखील टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवला जातो. यावेळेस एकदिवसीय वर्ल्डकप होणार आहे, त्यामुळे आशिया चषक २०२३ देखील एकदिवसीय स्वरुपात खेळवला जाणार आहे. आशिया चषकात ६ संघ सहभागी होत आहेत. यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका या व्यतिरिक्त बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळचे संघ आहेत. नेपाळ प्रथमच आशिया कपमध्ये खेळणार आहे. आशिया चषकाच्या इतिहासात भारताने सर्वाधिक जेतेपद पटकावली आहेत. भारताने एकूण ७ वेळा आशिया कप जिंकला आहे, तर श्रीलंकेने ६ आणि पाकिस्तानने २ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. आशिया कप २०२३ मध्ये अ गटात पाकिस्तान, भारत आणि नेपाळ, तर ब गटात श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या संघांचा समावेश आहे. आशिया कप २०२३ चा अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल.
आशिया कपची सुरुवात १९८४ मध्ये झाली होती. पहिली स्पर्धा युएईमध्ये (UAE) खेळवण्यात आली होती. पहिला आशिया कप भारताने जिंकला होता. आशिया चषकाच्या इतिहासात भारताने सर्वाधिक जेतेपद पटकावली आहेत. भारताने एकूण ७ वेळेस आशिया कप जिंकला आहे, तर श्रीलंकेने ६ आणि पाकिस्तानने २ वेळा विजेतेपद पटकावले आहे. पाकिस्तानने २००० आणि २०१२ मध्ये आशिया कप जिंकला आहे. या आधीचा आशिया चषक २०२२ मध्ये UAE मध्ये झाला होता. २०२२ चा आशिया चषक श्रीलंकेने जिंकला. आशिया कप २०२२ च्या फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव केला होता. आशिया चषकातील भारतीय संघाच्या कामगिरीबाबत बोलायचे झाले तर भारताने १९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१६ आणि २०१८ मध्ये जेतेपद पटकावले आहे, तर श्रीलंकेने १९८६, १९९७, २००४, २००८, २०१२ आणि २०१८ मध्ये आशिया चषक जिंकला आहे. बांगलादेशने कधीही आशिया चषकाचे विजेतेपद पटकावलेले नाही, परंतु ३ वेळा ते उपविजेते राहिले आहेत. बांगलादेशने २०१२, २०१६, २०१८ मध्ये आशिया चषकाची फायनल गाठली होती. पण त्यांना विजय मिळवता आला नाही. २०१६ आणि २०२२ चा आशिया कप टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आला होता. २०१६ मध्ये पहिल्यांदा आशिया चषक टी-२० फॉरमॅटमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्या आशिया कपमध्ये भारताने बांगलादेशला हरवून विजेतेपद पटकावले होते. आशिया चषक १९८४ आणि १९८६ हा फक्त ३ संघांमध्ये खेळला गेला होता. १९८४ मध्ये आशिया कपमध्ये पाकिस्तान, श्रीलंका आणि भारत हे संघच सहभागी झाले होते, तर १९८६ मध्ये भारताने या स्पर्धेतून माघार घेतली होती. १९८६ मध्ये बांगलादेशने पहिल्यांदाच आशिया कपमध्ये भाग घेतला होता. यानंतर ही स्पर्धा १९८८ मध्ये ४ संघांमध्ये खेळली गेली. पाकिस्तानने १९९०-९१ आशिया कपमधून माघार घेतली होती. अशा प्रकारे, आतापर्यंतच्या सर्व आशिया चषक स्पर्धेत सहभागी झालेला श्रीलंका हा एकमेव संघ आहे. यूएई आणि हाँगकाँगने २००४ मध्ये आशिया कपमध्ये पदार्पण केले होते, तर अफगाणिस्तानने २०१४ मध्ये आशिया कपमध्ये पदार्पण केले. नेपाळ यंदाच्या आशिया चषकात पदार्पण करणार आहे. आशिया चषक २०२२-२३ चे भारतातील प्रसारण हक्क स्टार स्पोर्ट्सकडे आहेत, तर पाकिस्तानातील प्रसारणाचे अधिकार पीटीव्ही आणि टेन स्पोर्ट्सकडे आहेत. आशिया कप दर २ वर्षांनी एकदा खेळवला जातो. १९९३ मध्ये भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध चांगले नसल्यामुळे आशिया कप रद्द करावा लागला होता. आशिया कप २०२३ चे वेळापत्रक १९ जुलै २०२३ रोजी जाहीर करण्यात आले. एका क्षणी असे वाटत होते की यंदाचा आशिया चषक देखील रद्द करावा लागेल, परंतु अखेरीस पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) आशियाई क्रिकेट परिषद (ACC) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांच्यापुढे नमते घ्यावे लागले. आशिया चषक 2023 चे सर्व सामने पाकिस्तानातच व्हावेत, यावर पीसीबी ठाम होते. त्याच वेळी, बीसीसीआयला आशिया कप हा हायब्रीड मॉडेलवर किंवा तटस्थ ठिकाणी व्हावे, असे वाटत होते. आशिया चषक 2023 मध्ये एकूण १३ सामने खेळवले जाणार आहेत, त्यापैकी फक्त चार सामने पाकिस्तानमध्ये खेळले जातील, तर उर्वरित ९ सामने श्रीलंकेच्या कँडी आणि कोलंबोमध्ये होणार आहेत.
आशिया चषक २०२३ पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळवला जाणार आहे.
आशिया कप २०२३ चे यजमानपद कोणाला मिळाले आहे?
आशिया चषक २०२३ चे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे, तर श्रीलंका सह-यजमान आहे.
टीम इंडिया आशिया कप २०२३ जिंकू शकेल का?
टीम इंडिया आशिया कपमधील सर्वात यशस्वी संघ आहे. टीम इंडियाने एकूण ७ वेळेस आशिया कप जिंकला आहे. अशा परिस्थितीत, यंदा देखील भारतीय क्रिकेट संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.
आशिया कप यावेळेस कोणत्या फॉरमॅटमध्ये होणार आहे?
यावर्षी आयसीसी एकदिवसीय विश्वचषक होणार जाणार आहे. त्यामुळे आशिया कप 2023 हादेखील एकदिवसीय स्वरूपात असेल. ज्यावर्षी टी-20 वर्ल्डकप असतो, त्यावर्षी आशिया कपदेखील टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जातो.
आशिया कप २०२३ साठी भारताने पाकिस्तानला भेट देण्यास नकार दिला का?
होय, भारत आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्यास उत्सुक नव्हता आणि म्हणूनच आशियाई क्रिकेट परिषदेने एक हायब्रीड मॉडेल प्रस्तावित केले होते.
आशिया कप २०२३ मध्ये भारत-पाकिस्तान सामन्याचे ठिकाण कोणते आहे?
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना २ सप्टेंबर रोजी केंडी येथे होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता होणार आहे.
आशिया कप स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ कोणता?
आशिया चषक स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ भारत आहे. भारताने ७ वेळा आशिया कप जिंकला आहे.
भारताने कोणत्या वर्षी आशिया कपची जेतेपदं पटकावली आहेत?
भारताने १९८४, १९८८, १९९०/९१, १९९५, २०१०, २०१६ आणि २०१८ मध्ये आशिया चषकात विजेतेपदं पटकावली आहेत.