Rohit Sharma : रोहित शर्माने रचला इतिहास, गांगुली-सचिनला जमलं नाही ते करून दाखवलं, पाहा-rohit sharma brings up 10000 odi runs rohit sharma odi career india vs sri lanka asia cup 2023 match scorecard ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Rohit Sharma : रोहित शर्माने रचला इतिहास, गांगुली-सचिनला जमलं नाही ते करून दाखवलं, पाहा

Rohit Sharma : रोहित शर्माने रचला इतिहास, गांगुली-सचिनला जमलं नाही ते करून दाखवलं, पाहा

Sep 12, 2023 03:50 PM IST

rohit sharma 10000 ODI runs : रोहित शर्माने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारा रोहित हा सहावा भारतीय फलंदाज आहे.

Rohit Sharma 10 thousands runs
Rohit Sharma 10 thousands runs (AP)

rohit sharma completed 10000 ODI runs : रोहित शर्माने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारा रोहित हा सहावा भारतीय फलंदाज आहे. २४८ सामन्यांच्या २४१ डावांत रोहित शर्माने हा टप्पा गाठला आहे.

रोहितने कसून राजिताच्या चेंडूवर षटकार ठोकत हा टप्पा गाठला. रोहितने २४१ डावात १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. सर्वात जलद १० हजार धावा पूर्ण करण्याच्याबाबतीत रोहित शर्मा कोहलीनंतर दुसरा भारतीय ठरला आहे. कोहलीने २०५ डावात १० हजार धावा पूर्ण केल्या होत्या. या भारतीय यादीत सचिन तेंडुलकर तिसऱ्या क्रमांकावर आहे. १० हजार वनडे धावा पूर्ण करण्यासाठी सचिनला २५९ डाव लागले होते.

रोहित शर्माने आपल्या वनडे करिअरमध्ये २४८ सामन्यात ३० शतके आणि ५० अर्धशतके ठोकली आहेत. विशेष म्हणजे वनडेत तीन द्विशतकेही रोहित शर्माच्या नावावर आहेत.

या यादीत रोहितच्या नावाचा समावेश 

सर्वात जलद १०  हजार एकदिवसीय धावा (डाव)

२०५ - विराट कोहली

२४१ - रोहित शर्मा

२५९ - सचिन तेंडुलकर

२६३ - सौरव गांगुली

२६६ - रिकी पाँटिंग

 

१० हजार धावा करणारे भारतीय (ODI मध्ये)

१८४२६ - सचिन तेंडुलकर

१३०२४ - विराट कोहली

११३६३ - सौरव गांगुली

1१०८८९ - राहुल द्रविड

१०७७३ - महेंद्रसिंग धोनी

१००००*- रोहित शर्मा

कालच विराटने १३ हजार धावांचा टप्पा गाठला

विराट कोहलीने काल (११ सप्टेंबर) पाकिस्तानविरुद्ध १२२ धावांची नाबाद खेळी केली. यासोबतच विराट कोहलीने वनडे फॉरमॅटमध्ये १३ हजार धावांचा टप्पा गाठला. विराट कोहली वनडे फॉरमॅटमध्ये सर्वात जलद १३ हजार धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

Whats_app_banner