Most runs in asia cup 2023, आशिया चषक २०२३ मधील सर्वाधिक धावा व यशस्वी फलंदाज
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  आशिया चषक  /  सर्वाधिक धावा

आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू


यावेळेस आशिया चषक हा एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळवला जाणार आहे. पण ज्यावर्षी वर्षी टी-२० विश्वचषक होणार असेल तर त्यावर्षी आशिया कपदेखील टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवला जातो. आशिया चषक आतापर्यंत दोनदा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळला गेला आहे. एकदा २०१६ मध्ये आणि एकदा २०२२ मध्ये. टी-२० फॉरमॅटच्या आशिया कपमध्ये विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. या यादीत पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, आशिया कपच्या वनडे फॉरमॅटमध्ये श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. या यादीत श्रीलंकेचा कुमार संगकारा दुसऱ्या क्रमांकावर आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा शोएब मलिक चौथ्या तर भारताचा रोहित शर्मा पाचव्या क्रमांकावर आहे.

एकूण आशिया चषकात म्हणजेच, टी-२० आणि वनडे फॉरमॅटमधील आशिया कप मिळून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सनथ जयसुर्याच्या नावे आहे. यानंतर कुमार संघकाराने आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. या दोन श्रीलंकन फलंदाजांनंतर आशिया चषकात सर्वाधिक धावा विराट कोहली आणि रोहित शर्माने केल्या आहेत. कोहली तिसऱ्या तर रोहित चौथ्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय आणि टी-२० फॉरमॅटसह आशिया कपमध्ये १ हजार धावांचा टप्पा ओलांडणारे केवळ ४ फलंदाज आहेत. फक्त जयसूर्या, संगकारा, विराट आणि रोहित यांनी आशिया चषकात १ हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आशिया चषकात जयसूर्याने सर्वाधिक शतके केली आहेत, तर विराट कोहली आणि संगकारा यांनी प्रत्येकी ४ शतके झळकावली आहेत.
PlayerTeamsRunsSRMatInnNOHSAvg30s50s100s6s
1
Shubman GillShubman Gill
IND30293662121750216
2
Kusal MendisKusal Mendis
SL2708566092450305
3
Sadeera SamarawickramaSadeera Samarawickrama
SL2158966093351202
4
Babar AzamBabar Azam
PAK20797540151510014
5
Mohammad RizwanMohammad Rizwan
PAK1959454286*971203
6
Rohit SharmaRohit Sharma
IND19410765174*4803011
7
Najmul Hossain ShantoNajmul Hossain Shanto
BAN19385220104960112
8
Iftikhar AhmedIftikhar Ahmed
PAK179122531109*891016
9
Charith AsalankaCharith Asalanka
SL1797466262*442103
10
Shakib Al HasanShakib Al Hasan
BAN1739755180431204
11
KL RahulKL Rahul
IND16989431111*841012
12
Mehidy HasanMehidy Hasan
BAN15884551112390013
13
Towhid HridoyTowhid Hridoy
BAN1586855082310203
14
Ishan KishanIshan Kishan
IND1438164182471103
15
Pathum NissankaPathum Nissanka
SL1327866041222000

बातम्या

आशिया कप सर्वाधिक धावा FAQ

आशिया कपमध्ये किती फलंदाजांनी १००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत?

आशिया कपमध्ये ४ फलंदाजांनी १ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. या यादीत विराट कोहली आणि रोहित शर्माचाही समावेश आहे.

आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा कुणाच्या नावावर आहेत?

आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्याच्या नावावर आहे

आशिया कपमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या कोणती आहे?

आशिया कपमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या विराट कोहलीच्या नावे आहे. त्याने २०१२ मध्ये वनडे फॉरमॅटमध्ये पाकिस्तानविरुद्ध १८३ धावा केल्या होत्या. तसेच, टी-20 आशिया कपमध्येही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या विराट कोहलीच्याच नावे आहे, त्याने २०२२ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद १२२ धावा केल्या होत्या.

आशिया कप T20 मध्ये सर्वाधिक धावा कोणी केल्या?

विराट कोहली हा आशिया कप T20I मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल आहे. त्याने १० सामन्यांमध्ये ४२९ धावा केल्या आहेत.

आशिया चषकात विराट कोहलीची कामगिरी कशी राहिली?

विराट कोहलीने आशिया कपमध्ये ११ एकदिवसीय सामन्यांमध्ये ६१३ धावा आणि १० टी-20 सामन्यांमध्ये ४२९ धावा केल्या आहेत.

आशिया चषकात रोहित शर्माचा रेकॉर्ड काय?

रोहित शर्माच्या नावावर आशिया चषकात २२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७४५ धावा करण्याचा एक मजबूत रेकॉर्ड आहे. सचिन तेंडुलकरच्या २३ सामन्यांत ९७१ धावांनंतर तो दुसरा भारतीय आहे.