मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  दृष्टिक्षेप  /  इथे रंगणार सामने

आशिया कपमधील सामन्यांची ठिकाणं


आशिया कप २०२३ या स्पर्धेत श्रीलंका, पाकिस्तान, भारत, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ असे ६ संघ सहभागी होणार आहेत. आशिया कप २०२३ या स्पर्धेत दोन गट असतील. प्रत्येक गटातून दोन संघ सुपर फोरसाठी पात्र ठरतील. त्यानंतर सुपर फोरमधील अव्वल दोन संघ अंतिम फेरीत प्रवेश करतील. एकूण १३ एकदिवसीय सामने खेळवले जातील. ही स्पर्धा ३१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. आशिया कप २०२३ हा पाकिस्तानात होणार होता, पण BCCI आपला संघ पाकिस्तानात पाठवण्यास तयार नव्हता. यानंर बरीच चर्चा आणि वादविवादनंतर ही स्पर्धा आता हायब्रीड मॉडेलनुसार खेळवली जाणार आहे. आशियाच चषकाचे ४ सामने पाकिस्तानमध्ये तर ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत.

आशिया चषकाचा पहिला सामना ३० ऑगस्ट रोजी मुल्तानमध्ये पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होईल. यानंतर उर्वरित ३ सामने हे लाहोर येथे खेळवण्यात येणार आहेत. पाकिस्तानातील हे ४ सामने खेळल्यानंतर पुढील सर्व सामने श्रीलंकेत रंगणार आहेत. आशिया कपमधील ३ सामने कँडी येथे तर उर्वरित ६ सामने कोलंबो येथे खेळवण्यात येणार आहेत. आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामना २ सप्टेंबरला कँडी येथे रंगणार आहे. यानंतर सुपर फोरमधील भारत-पाकिस्तान सामना १० सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये होऊ होईल. आशिया कप २०२३ चा अंतिम सामना कोलंबो येथे खेळवण्यात येणार आहे. पाकिस्तान स्थळ- मुल्तान, लाहोर

श्रीलंका स्थळ- कँडी, कोलंबो
गद्दाफी क्रिकेट स्टेडियम

गद्दाफी क्रिकेट स्टेडियम

लाहोर, पाकिस्तान
पाकिस्तानातील लाहोर या ऐतिहासिक शहरात गद्दाफी क्रिकेट स्टेडियम आहे. मुघल वास्तुकलेची झाक असलेल्या गद्दाफी स्टेडियमला विटांच्या आखीवरेखीव बांधकामामुळं वेगळंच सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. प्रख्यात वास्तुविशारद नय्यर अली दादा यांनी या स्टेडियमचा आराखडा तयार केला होता. लिबियाचे कर्नल गद्दाफी यांचं नाव या स्टेडियमला देण्यात आलं आहे. गद्दाफी स्टेडियमवर १९५९ साली पहिल्या कसोटी सामन्याचं आयोजन केलं होतं. पाकिस्तान दौऱ्यावर असलेला ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तानविरुद्ध या मैदानावर कसोटी खेळला होता. १९९६ साली झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचं आयोजन करण्यासाठी गद्दाफी स्टेडियमचं नूतनीकरण करण्यात आलं. हे पाकिस्तानातील सर्वात मोठं स्टेडियम आहे. नुतनीकरण केलेल्या स्टेडियममध्ये काँकिट ऐवजी प्लास्टिकचे बेंच टाकण्यात आले आहेत. या स्टेडियमची क्षमता ६० हजारांहून अधिक प्रेक्षकांना सामावून घेण्याची आहे. १९९६ चा क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना गद्दाफी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात खेळवला गेला होता. सुरुवातीला हे मैदान लाहोर स्टेडियम म्हणून ओळखलं जात होतं, मात्र १९७४ मध्ये गद्दाफी असं त्याचं नामांतर करण्यात आलं. गद्दाफी स्टेडियम पाकिस्तानसाठी शुभ मानला जातो. पाकिस्तानी क्रिकेटच्या प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यांचं हे मैदान साक्षीदार आहे. १९७६ मध्ये याच स्टेडियमवर जावेद मियाँदाद आणि आसिफ इक्बाल यांनी न्यूझीलंडविरुद्ध पाचव्या विकेटसाठी २८१ धावांची विक्रमी भागीदारी केली होती. इंझमाम उल हक यांनं आपलं त्रिशतकही याच मैदानात झळकावलं होतं. ती कामगिरीही त्यानं न्यूझीलंडविरोधातच केली होती. अलीकडच्या काळात मात्र एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांना तुरळक गर्दी होत असल्यानं या स्टेडियमचं महत्त्व कमी झालं आहे.
…read more

MATCHES WON

Batting First34 Won
Bowling First31 Won
50.75%49.25%
Avg 1st Innings253
Avg 2nd Innings218
PACE
69.89%

Percentage of wickets
taken by pacers

SPIN
30.11%

Percentage of wickets
taken by spinners

Pace Friendly

Team-wise Asia Cup performance at Gaddafi Stadium, Lahore

TeamsMatchesWonLostTieWin %
553419062
14104071
725029
642067
10100
मुलतान क्रिकेट स्टेडियम

मुलतान क्रिकेट स्टेडियम

मुलतान, पाकिस्तान
मुलतान हे पाकिस्तानातील सर्वात मोठं आणि प्रसिद्ध क्रिकेट मैदानांपैकी एक आहे. पाकिस्तातील बहुपयोगी मैदानांपैकी हे मैदान आहे. क्रिकेट बरोबरच फुटबॉल सामन्यांचं आयोजनही या स्टेडियमवर केलं जातं. एका वेळी सुमारे ३० हजार प्रेक्षकांना सामावून घेण्याची या स्टेडियमची क्षमता आहे. मुलतान स्टेडियमवर खेळाडूंसाठी चांगल्या सुविधा आहेत. मैदान हिरवेगार असल्यामुळे अत्यंत मनोहारी व नयनरम्य दिसते. मुलतान क्रिकेट स्टेडियम पाकिस्तानमधील सर्वात सुंदर स्टेडियम आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अलीकडंच मैदानावर फ्लड लाइट्स लावण्यात आले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडं या मैदानाची मालकी आहे. २००१ साली हे स्टेडियम खेळासाठी खुलं करण्यात आलं होतं. मुलतान शहराच्या मध्यभागी वसलेल्या जुन्या कासिम बाग स्टेडियमच्या जागी हे मैदान उभारण्यात आलं आहे. मुलतान स्टेडियमवर पहिला कसोटी सामना २००१ साली झाला होता. या कसोटीत पाकिस्ताननं बांगलादेशचा एक डाव आणि २६४ धावांनी पराभव केला होता. त्यानंतर या स्टेडियमवर नियमितपणे कसोटी सामन्याचं आयोजन होत आलं आहे. एकदिवसीय सामन्यांसाठी देखील हे स्टेडियम अत्यंत लोकप्रिय आहे. २००३ पासून इथं एकदिवसीय सामन्यांचं आयोजन केलं जातं. या स्टेडियमवर पहिला एकदिवसीय सामना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला होता. हा सामना पाकिस्ताननं एकहाती जिंकला होता.
…read more

MATCHES WON

Batting First6 Won
Bowling First5 Won
54.55%45.45%
Avg 1st Innings263
Avg 2nd Innings197
PACE
63.16%

Percentage of wickets
taken by pacers

SPIN
36.84%

Percentage of wickets
taken by spinners

Pace Friendly

Team-wise Asia Cup performance at Multan Cricket Stadium, Multan

TeamsMatchesWonLostTieWin %
1183073
20200
1100100
10100
प्रेमदासा स्टेडियम

प्रेमदासा स्टेडियम

कोलंबो, श्रीलंका
श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील खेतारामा मंदिराशेजारील दलदलीच्या जमिनीवर आर प्रेमदासा स्टेडियम उभारण्यात आलं आहे. श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रणसिंघे प्रेमदासा यांचं नाव या स्टेडियमला देण्यात आलं आहे. श्रीलंकेतील हे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. पूर्वी हे स्टेडियम 'खेतरामा स्टेडियम' म्हणून ओळखले जात होते. विश्वचषक सामन्यांचं आयोजन करणाऱ्या श्रीलंकेतील तीन मैदानांपैकी हे एक मैदान आहे. कसोटी सामन्याच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचं साक्षीदार म्हणून हे स्टेडियम ओळखलं जातं. भारताविरुद्ध झालेल्या एका कसोटी सामन्यात श्रीलंकेनं याच मैदानावर ६ बाद ९५२ अशी धावसंख्या उभारली होती. प्रेमदासा स्टेडियमवर अलीकडच्या काळात कसोटी सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं नाही. मात्र, अजूनही हे स्टेडियम श्रीलंकेतील सर्वोत्तम स्टेडियमपैकी आहे.
…read more

MATCHES WON

Batting First80 Won
Bowling First59 Won
54.05%45.95%
Avg 1st Innings236
Avg 2nd Innings194
PACE
54.64%

Percentage of wickets
taken by pacers

SPIN
45.36%

Percentage of wickets
taken by spinners

Pace Friendly

Team-wise Asia Cup performance at R.Premadasa Stadium, Colombo

TeamsMatchesWonLostTieWin %
1277841061
502620052
261410054
1311208
10100
पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियम

पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियम

कँडी, श्रीलंका
कँडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियम २००९ मध्ये उभारण्यात आलं असून त्यांची प्रेक्षक क्षमता ३५ हजार इतकी आहे. श्रीलंकेतील सर्वात नवीन स्टेडियमपैकी हे एक आहे.१९८३ ते २००७ या कालावधीत अनेक कसोटी सामन्यांचे साक्षीदार राहिलेलं हे स्टेडियम पूर्वी असगिरिया स्टेडियम म्हणून ओळखलं जात होतं. त्याच जागी नवीन पल्लेकले स्टेडियम उभारण्यात आलं आहे. पल्लेकेले स्टेडियमवर २०१० साली श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला गेला. त्यानंतर २०११ च्या आयसीसी विश्वचषकापासून इथे एकदिवसीय सामनेही आयोजित होऊ लागले. श्रीलंकेच्या राष्ट्रीय संघाचं होम ग्राउंड असलेलं हे स्टेडियम कंदुरता संघाचं यजमानपद भूषवतं. २०१२ च्या आयसीसी ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेतील काही सामन्यांचं आयोजन देखील या मैदानात करण्यात आलं होतं. याच मैदानावर श्रीलंकेचा गोलंदाज सुरंगा लकमल यानं पहिल्या चेंडूवर कसोटी बळी घेऊन कपिल देव आणि इम्रान खान यांच्या रांगेत स्थान मिळवलं आहे.
…read more

MATCHES WON

Batting First16 Won
Bowling First21 Won
41.03%58.97%
Avg 1st Innings257
Avg 2nd Innings205
PACE
60.08%

Percentage of wickets
taken by pacers

SPIN
39.92%

Percentage of wickets
taken by spinners

Pace Friendly

Team-wise Asia Cup performance at Pallekele International Cricket Stadium, Kandy

TeamsMatchesWonLostTieWin %
351915054
623033
614017
540080
211050
10100

बातम्या

आशिया कपमधील सामन्यांची ठिकाणं FAQ

आशिया कप २०२३ चा अंतिम सामना कुठे होणार आहे?

आशिया कप २०२३ चा अंतिम सामना कोलंबो येथे खेळवण्यात येणार आहे.

आशिया चषकात किती संघ सहभागी होणार आहेत?

आशिया कप २०२३ या स्पर्धेत श्रीलंका, पाकिस्तान, भारत, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ असे ६ संघ सहभागी होणार आहेत.

आशिया कपचे किती सामने पाकिस्तानात खेळवले जातील?

आशिया कपमधील उद्घाटन सामन्यासह एकूण ४ सामने पाकिस्तानात खेळवले जाणार आहेत.