मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Shreyas Iyer : श्रेयस अय्यरला झालंय तरी काय? कसली दुखापत? श्रीलंकेविरुद्धही खेळणार नाही, जाणून घ्या

Shreyas Iyer : श्रेयस अय्यरला झालंय तरी काय? कसली दुखापत? श्रीलंकेविरुद्धही खेळणार नाही, जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 12, 2023 03:00 PM IST

shreyas iyer ruled out from india vs sri lank : भारतीय संघ एका बदलासह मैदानात उतरला आहे. शार्दुल ठाकूरच्या जागी अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघात तीन फिरकी गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे.

shreyas iyer ruled out from india vs sri lank match
shreyas iyer ruled out from india vs sri lank match (AP)

shreyas iyer ruled out from india vs sri lank todays match : आशिया कप 2023 च्या सुपर 4 मध्ये पाकिस्तानला धुळ चारल्यानंतर आज (१२ सप्टेंबर) टीम इंडियाचा सामना श्रीलंकेशी होत आहे. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघ एका बदलासह मैदानात उतरला आहे. शार्दुल ठाकूरच्या जागी अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघात तीन फिरकी गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजासोबत अक्षर पटेलही हा सामना खेळत आहे. श्रीलंकेच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

विशेष म्हणजे, या सामन्यातूनही भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर बाहेर पडला आहे. श्रेयस अय्यर काल पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही खेळला नव्हता. बीसीसीआयने एक आता एक अपडेट जारी करून तो श्रीलंकेविरुद्ध खेळणार नसल्याची माहिती दिली आहे. शस्त्रक्रियेनंतर तंदुरुस्त झाल्यानंतर तो नुकताच संघात परतला होता. मार्चमध्ये त्याच्या पाठीला दुखापत झाली. मात्र, आता ही समस्या पुन्हा एकदा समोर आली आहे.

अय्यर पाठीच्या दुखण्यापासून पूर्णपणे बरा झालेला नाही

हेल्थ अपडेट जारी करताना, बीसीसीआयने सांगितले की, “श्रेयस अय्यरला बरे वाटत आहे, परंतु अद्याप तो पाठीच्या दुखण्यापासून पूर्णपणे बरा झालेला नाही. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून आज श्रीलंकेविरुद्ध भारताच्या सुपर-4 सामन्यासाठी संघासोबत स्टेडियममध्ये गेला नाही”.

नेपाळविरुद्ध झाली दुखापत

आता असा प्रश्न उपस्थित होत आहे, की जर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली तर १७ सप्टेंबरला होणाऱ्या विजेतेपदाच्या सामन्यापर्यंत तो फिट होईल का? विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसू शकतो. नेपाळविरुद्धच्या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना डायव्ह मारल्यानंतर श्रेयसला दुखापत झाली होती.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

श्रीलंका: पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेलालागे, महिश तिक्षाना, कसुन राजिथा, मथिशा पाथिराना.

IPL_Entry_Point