मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Asia Cup 2023 : पाकिस्तानी गोलंदाजीचा कणा मोडला, हरिस रौफ आणि नसीम शाह आशिया कपमधून बाहेर?

Asia Cup 2023 : पाकिस्तानी गोलंदाजीचा कणा मोडला, हरिस रौफ आणि नसीम शाह आशिया कपमधून बाहेर?

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 12, 2023 01:21 PM IST

naseem shah and haris rauf ruled out from asia cup : भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचे तीन खेळाडू जखमी झाले आहेत. पाकिस्तानने बॅकअप खेळाडूंना श्रीलंकेत बोलावले आहे

Asia Cup 2023
Asia Cup 2023

naseem shah and haris rauf ruled out from asia cup : आशिया कपमध्ये भारताविरुद्धच्या दारूण पराभवानंतर पाकिस्तानवर संकटांचा डोंगर कोसळला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचे तीन खेळाडू जखमी झाले होते. आता आशिया चषकाच्या उर्वरित सामन्यांमधून पाकिस्तानचे स्टार गोलंदाज हरिस रौफ आणि नसीम शाह हे जवळपास बाहेर झाले आहेत. पाकिस्तानचा धडाकेबाज फलंदाज आगा सलमानही रूग्णालयात असून तोही स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो.

पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज हारिस रौफ भारताविरुद्ध पहिल्यांदा दुखापतग्रस्त झाला होता. रौफने राखीव दिवशी गोलंदाजी केली नाही आणि तो मैदानाबाहेर राहिला. हाताच्या समस्येमुळे नसीम शाह भारतीय डावाच्या ४९व्या षटकात मैदानाबाहेर गेला आणि फलंदाजीसाठी मैदानात परतला नाही.

या दोन्ही खेळाडूंच्या दुखापती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पाकिस्तानचे वैद्यकीय पथक दोन्ही खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहे.

दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेऊन पाकिस्तानने बॅकअप खेळाडूंना श्रीलंकेत बोलावले आहे. बॅकअप म्हणून शाहनवाज दहानी आणि जमान खान यांना श्रीलंकेत बोलावण्यात आले आहे. हरिस रौफ आणि नसीम शाह यांचे फिटनेस अपडेट मंगळवारी समोर येणार आहे. हे दोन खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडल्यास शाहनवाज दहानी आणि जमान खान यांचा संघात समावेश होईल.

आगा सलमानही जखमी

सोमवारी रवींद्र जडेजाच्या चेंडूवर आगा सलमान हेल्मेटशिवाय फलंदाजी करत होता. जडेजाचा एक चेंडू सलमानच्या डोळ्याखाली आदळला. सलमानाच्या चेहऱ्यावरुन रक्त येत होते.  मात्र त्यावेळी आगा सलमानने फलंदाजी सुरूच ठेवली होती. मात्र सामना संपल्यानंतर आगा सलमानला हॉस्टेलमध्ये दाखल करण्यात आले आणि तो संघासह हॉटेलमध्ये परतला नाही. या स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमध्ये सलमान खेळणार की नाही हे निश्चित नाही. तसेच, अद्याप सलमानच्या जागी बॅकअपला बोलावण्यात आलेले नाही.

IPL_Entry_Point