आयपीएल २०२४ चा ४३ वा सामना आज (२७ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात मुंबई इंडियन्सने एक बदल केला आहे. जेराल्ड कोएत्झीच्या जागी ल्यूक वुडला संधी मिळाली आहे. त्याचवेळी कुमार कुशाग्रचा दिल्लीच्या प्लेइंग ११ मध्ये प्रवेश झाला आहे. त्याला पृथ्वी शॉच्या जागी संधी मिळाली आहे.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, पियुष चावला, ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.
दिल्ली कॅपिटल्स: जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुमार कुशाग्रा, शाई होप, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, लिझाद विल्यम्स, मुकेश कुमार, खलील अहमद.
दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण ३४ सामने खेळले गेले आहेत. यापैकी मुंबईने १९ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर दिल्लीने १५ सामने जिंकले आहेत.
त्याचवेळी अरुण जेटली स्टेडियममध्ये दोन्ही संघांमध्ये ११ सामने खेळले गेले आहेत. यातील मुंबईने ५ आणि दिल्लीने ६ सामने जिंकले आहेत.
अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली आणि मुंबई यांच्यातील रोमांचक सामना रंगणार आहे. आयपीएल २०२४ मध्ये दिल्लीच्या या मैदानावर अनेक चौकार आणि षटकार पाहायला मिळाले आहेत. या मैदानावर गोलंदाजांना धावांवर नियंत्रण ठेवणे कठीण जात आहे. दिल्ली आणि गुजरात यांच्यात झालेल्या याआधीच्या सामन्यात ४० षटकात एकूण ४४४ धावा झाल्या होत्या. दिल्लीने दिलेल्या २२५ धावांच्या लक्ष्यापासून गुजरात अवघ्या ४ धावा दूर होता.
संबंधित बातम्या