पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून पतीने पत्नीला जिवंत जाळले आहे. आरोपी भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ही धक्कादायक घटना पुण्यातील गणपती माथा वारजे-माळवाडी परिसरात घडली आहे.
प्रवीण बाबासाहेब चव्हाण (वय २६, रा. अहिरे गाव) असे आरोपीचे नाव असून पूजा प्रवीण चव्हाणअसे मृत तरुणीचे नाव आहे.
घरगुती वादातून दाम्पत्यामध्ये झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. रागाच्या भरात पतीने डिझेल पत्नीच्या अंगावर ओतले व तिला आग लावली. गंभीर भाजलेल्या पत्नीला त्याने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर आरोपी रुग्णालयातून पळून गेला. वारजे-माळवाडीचे पोलिस निरीक्षक मनोज शेंडगे यांनी सांगितले की, आरोपींच्या अटकेसाठी आम्ही एक पथक तयार केले आहे. मृत महिलेचा भाऊ अमोल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०२ आणि ४९८ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्नाटकातील तुमकुरू येथे एका व्यक्तीने पत्नीचा गळा चिरून खून केला. यानंतर पत्नीची कातडी सोलून रात्रभर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पत्नीने रात्रीचे जेवण देण्यास नकार दिल्याने रागाच्या भारत त्याने पत्नीची हत्या केल्याचे कबूल केले आहे. घरातील स्वयंपाकघरात आरोपीने पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे लपवले होते. आरोपी पती हा पत्नी आणि ८ वर्षाच्या मुलासह राहत होता. दोघांचेही सुमारे १० वर्षांपूर्वी लग्न झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पा (वय३५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर शिवराम असे आरोपी पतीचे नाव आहे. शिवराम हा एका मिलमध्ये कामाला होता. त्याने पत्नी पुष्पाला जेवण मागितले. मात्र, तिने जेवण बनवले नाही असे सांगत जेवण देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने दोघांत जोरदार भांडण झाले. यात रागाच्या भरात शिवरामने संतापून पुष्पाची चाकूने भोसकून हत्या केली.
संबंधित बातम्या