kkr captain shreyas iyer net worth : कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीगच्या १७व्या हंगामाची ट्रॉफी जिंकली आहे. केकेआरने अंतिम फेरीत सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव करत तिसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचा पराक्रम केला आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात केकेआरने यंदा अप्रतिम कामगिरी केली. या मोसमात केकेआर समोर जो कोणता संघ आला त्याला चिरडत त्यांनी आयपीएल ट्रॉफी जिंकली. श्रेयस अय्यरने कर्णधार म्हणून पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे. अशा स्थितीत आपण कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरची एकूण संपत्ती किती आहे? ते जाणून घेऊया.
श्रेयस अय्यर हा भारताच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. श्रेयस २०२४ च्या टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये नाही. पण पण २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात त्याने मोलाचे योगदान दिले होते.
श्रेयस अय्यर त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि तो मधल्या फळीत खेळतो.
श्रेयस अय्यरचे अजून लग्न झालेले नाही. श्रेयसने लहान वयातच क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर पैसा कमावला. भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर त्याची एकूण संपत्ती ९० कोटी रुपये आहे. श्रेयस अय्यरच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणजे आयपीएल आणि याशिवाय त्याला बीसीसीआयच्या वार्षिक करारातूनही मोठी रक्कम मिळते.
श्रेयस अय्यरची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द २०१७ नंतर सुरू झाली, तो २०१५ पासून सतत टीम इंडियाचा भाग आहे आणि २०१५ पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. श्रेयस अय्यर देशांतर्गत सामन्यांमधूनही कमाई करतो आणि जाहिरातींमधूनही कमाई करतो. श्रेयस अय्यरला बीसीसीआयच्या वार्षिक करारातून ३ कोटी रुपये मिळतात.
श्रेयस अय्यरला पहिल्यांदा २०१५ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने २.६ कोटींमध्ये खरेदी केले होते. यानंतर २९१८ मध्ये त्याला आयपीएल पगार म्हणून ७ कोटी रुपये मिळाले होते. २०२२ मध्ये केकेआरने त्याला १२.५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते.
श्रेयस अय्यरकडे मुंबईत ११.८५ कोटी रुपयांचे ४ बीएसके अपार्टमेंट आहेत. या अपार्टमेंटमध्ये जिम, लायब्ररी, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, स्पा अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. श्रेयस अय्यरला आलिशान गाड्यांचाही छंद आहे. त्याच्याकडेअनेक महागड्या गाड्या आहेत.
संबंधित बातम्या