मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 Awards : मॅकगर्क बेस्ट स्ट्रायकर, नितीश उदयोन्मुख खेळाडू; तर सर्वोत्कृष्ट झेलचा पुरस्कार कोणाला मिळाला? पाहा

IPL 2024 Awards : मॅकगर्क बेस्ट स्ट्रायकर, नितीश उदयोन्मुख खेळाडू; तर सर्वोत्कृष्ट झेलचा पुरस्कार कोणाला मिळाला? पाहा

May 27, 2024 03:00 PM IST

ipl 2024 complete list of awards : विराट कोहली, हर्षल पटेल आणि सुनील नरेनसह अनेक खेळाडूंनी मोसमात पुरस्कार पटकावले आहेत. चला तर मग जाणून घेऊया IPL २०२४ च्या पुरस्कार सोहळ्यात कोणत्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले आहे.

Sunil Narine was named MVP of the tournament.
Sunil Narine was named MVP of the tournament. (PTI)

कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीगच्या १७व्या हंगामाची ट्रॉफी जिंकली आहे. केकेआरने अंतिम फेरीत सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव करत तिसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचा पराक्रम केला आहे. या मोसमात अनेक नवे आणि उदयोन्मुख खेळाडू उदयास आले आहेत, काही युवा खेळाडूंनी धावा करून तर काहींनी भरघोस विकेट्स घेत क्रिकेट विश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

विराट कोहली, हर्षल पटेल आणि सुनील नरेनसह अनेक खेळाडूंनी मोसमात पुरस्कार पटकावले आहेत. चला तर मग जाणून घेऊया IPL २०२४ च्या पुरस्कार सोहळ्यात कोणत्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले आहे.

विजेता केकेआरला २० कोटी रुपये मिळाले: आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव करून ट्रॉफी जिंकली. केकेआरला चॅम्पियन बनण्यासाठी २० कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.

सनरायझर्स हैदराबादला किती पैसे मिळाले: सनरायझर्स हैदराबाद आयपीएल २०२४ चा उपविजेता संघ होता, ज्याने लीग टप्प्यात अनेक मोठे विक्रम केले. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील एसआरएचला उपविजेतेपदासाठी १२.५ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

सीझनचा उदयोन्मुख खेळाडू: सनरायझर्स हैदराबादचा २१ वर्षीय अष्टपैलू नितीश रेड्डी याला आयपीएल २०२४ चा इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझनचा पुरस्कार मिळाला आहे. रेड्डीने या मोसमात १२ सामन्यात ३०३ धावा केल्या आणि गोलंदाजीत ३ बळीही घेतले. नितीशने त्याच्या पहिल्याच हंगामात अनेक महान पराक्रम केले आहेत. यासाठी त्यांला १० लाख रुपये मिळाले आहेत.

सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन: स्ट्रायकर ऑफ द सीझन पुरस्कार २२ वर्षीय दिल्ली कॅपिटल्सचा झंझावाती फलंदाज जेक फ्रेझर मॅकगर्कला देण्यात आला. मॅकगर्कने IPL २०२४ मध्ये ९ सामन्यात ३३० धावा केल्या. मात्र २३४ च्या स्ट्राईक रेटमुळे त्याला स्ट्रायकर ऑफ द सीझनचा पुरस्कार देण्यात आला आहे. यासाठी १० लाखांची रक्कम मिळाली आहे.

फॅन्टसी प्लेयर ऑफ द सीझन: फॅन्टसी प्लेयर ऑफ द सीझनचा पुरस्कार सुनील नरेनला मिळाला आहे, ज्यासाठी त्याला १० लाख रुपये मिळाले आहेत. काल्पनिक क्रिकेट खेळांमध्ये सहभागी होणाऱ्या युजर्ससाठी सुनील नरेन हा सर्वात महत्त्वाचा खेळाडू असल्याचे सिद्ध झाले. नरेनने या मोसमात बॉलिंग-बॅटिंगध्ये चमकदार कामगिरी केली.

सुपर सिक्स ऑफ द सीझन: सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माने आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक षटकार ठोकले. अभिषेकने या हंगामात ४२ षटकार मारले, ज्यासाठी त्याला फॅन्टसी सुपर सिक्स ऑफ द सीझन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याला १० लाख रुपये मिळाले.

ऑन द गो, फोर्स ऑफ द सीझन: सनरायझर्स हैदराबादच्या ट्रॅव्हिस हेडला मोसमात सर्वाधिक चौकार मारल्याबद्दल ऑन द गो फोर्स ऑफ द सीझन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हेडने या मोसमात एकूण ६४ चौकार मारले, ज्यासाठी त्याला १० लाख रुपये मिळाले.

कॅच ऑफ द सीझन: केकेआरच्या रमणदीप सिंगला कॅच ऑफ द सीझनचा पुरस्कार मिळाला. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात रमणदीपने अर्शिन कुलकर्णीचा असा झेल घेतला, जो त्याच्या आवाक्याबाहेर असतानाही त्याने तो पकडला.

सर्वात मौल्यवान खेळाडू: सुनील नरेनला IPL २०२४ मध्ये सर्वात मौल्यवान खेळाडूचा (most valuable player) पुरस्कार मिळाला आहे. कोलकाता नाईट रायडर्ससाठी मोसमाच्या सुरुवातीपासून नरेन हा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने फलंदाजीत ४८८ धावा केल्या आणि गोलंदाजीत १७ बळी घेतले. या कामगिरीमुळे नरेन मोसमातील सर्वात मौल्यवान खेळाडू ठरला. यासाठी त्याला १० लाख रुपये आणि ट्रॉफीही मिळाली.

ऑरेंज कॅप: विराट कोहलीने ऑरेंज कॅप जिंकली आहे, ज्यासाठी त्याला ऑरेंज कॅप आणि १० लाख रुपयांची रक्कम मिळाली आहे. कोहलीने IPL २०२४ मध्ये १५ सामन्यात ६१.७५ च्या सरासरीने ७४१ धावा केल्या.

पर्पल कॅप: हर्षल पटेलला पर्पल कॅप आणि मोसमात सर्वाधिक विकेट्स घेतल्याबद्दल १० लाख रुपये मिळाले. पंजाब किंग्जकडून खेळताना हर्षलने १४ सामन्यात २४ विकेट घेतल्या.

टी-२० वर्ल्डकप २०२४