मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  योग शिबिरात मृत्यू; प्रेक्षक परफॉर्मन्स समजून वाजवत राहिले टाळ्या अन् वृद्धाचा तडफडून मृत्यू, पाहा VIDEO

योग शिबिरात मृत्यू; प्रेक्षक परफॉर्मन्स समजून वाजवत राहिले टाळ्या अन् वृद्धाचा तडफडून मृत्यू, पाहा VIDEO

May 31, 2024 11:38 PM IST

Man dies at yoga camp : प्रेक्षकांनी परफॉर्मन्स समजून टाळ्या वाजवत राहिले मात्र स्टेजवर ७३ वर्षीय वृद्धाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

देशभक्तीपर गाणे सादर करताना वृद्धाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
देशभक्तीपर गाणे सादर करताना वृद्धाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू (PTI)

मध्य प्रदेशातील इंदूर येथे योग शिबिरात राष्ट्रध्वज घेऊन परफॉर्म करत असताना ७३ वर्षीय वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शहरातील फुटी खोटी भागात एका सामाजिक कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली.

ट्रेंडिंग न्यूज

या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत बलवीर सिंग छाबरा हे काही लोकांसोबत कार्यक्रमासाठी योग शिबिरात आले होते. हातात राष्ट्रध्वज घेऊन देशभक्तीपर गाण्यावर ते नाचत होते. त्यांनी लष्करी जवानाचा  वेशभूषा परिधान केला होता. मात्र परफॉर्म करतानाच छाब्रा यांचा मृत्यू झाला, अशी माहिती योग शिबिराशी संबंधित राजकुमार जैन यांनी दिली.

छाब्रा अचानक बेशुद्ध होऊन कोसळले. सुरुवातीला आम्हाला वाटलं की हा त्याच्या परफॉर्मन्सचा भाग आहे, पण जेव्हा ते एक मिनिटाहून अधिक वेळ झाला तरी उठले नाहीत, तेव्हा आम्हाला संशय आला, असे राजकुमार जैन म्हणाले.

 

छाबरा यांना सीपीआर देण्यात आला आणि जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे ईसीजी आणि इतर चाचण्यांनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले, असे जैन यांनी सांगितले. खासगी रुग्णालयातील एका अधिकाऱ्याने जैन यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे.

छाबरा यांचा मुलगा जगजीत सिंग यांनी सांगितले की, त्यांचे वडील अनेक वर्षांपासून देशभक्तीपर गाण्यांवर नृत्य सादर करत होते. मृत व्यक्ती सामाजिक कार्यात सक्रीय होती. कुटुंबीयांनी छाबरा यांचे डोळे आणि त्वचा दान केली आहे, अशी माहिती मृताच्या मुलाने दिली आहे.

छाब्रा यांच्या आकस्मिक मृत्यूच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. दुर्दैवाने आजूबाजूला इतके लोक उपस्थित असतानाही त्यांचे निधन झाले, कोणालाही त्यांची स्थिती समजू शकली नाही. त्यांना वेळीत मदत मिळली असती किंवा सीपीआर मिळाला असता तर कदाचित त्यांचा जीव वाचवता आला असता, असे एका युजरने म्हटले आहे.

देशभक्तीपर गाणी गात असतानाही एक वृद्ध व्यक्ती कोसळते आणि त्यांच्या तब्येतीची जाणीव कुणालाच झाली नाही. या मृत व्यक्तीला वेळीच वैद्यकीय मदत मिळाली असती तर त्यांचा जीव वाचू शकला असता.

तिसऱ्या एका व्यक्तीने म्हटले की, "भीतीदायक, आजूबाजूच्या कोणालाही हृदयविकाराचा झटका आल्याची जाणीव झाली नाही.

टी-२० वर्ल्डकप २०२४