मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  KKR Champion : शाहरुख खानने सिनेमा आणि क्रिकेट दोन्ही जिंकले… सचिन, युवी-वीरूकडून केकेआरचं कौतुक

KKR Champion : शाहरुख खानने सिनेमा आणि क्रिकेट दोन्ही जिंकले… सचिन, युवी-वीरूकडून केकेआरचं कौतुक

May 27, 2024 05:26 PM IST

Sachin, Yuvraj congratulates KKR: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात केकेआरने यंदा अप्रतिम कामगिरी केली. या मोसमात केकेआर समोर जो कोणता संघ आला त्याला चिरडत त्यांनी आयपीएल ट्रॉफी जिंकली. श्रेयस अय्यरने कर्णधार म्हणून पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे.

KKR Champion : शाहरुख खानने सिनेमा आणि क्रिकेट दोन्ही जिंकले… सचिन, युवी-वीरूकडून केकेआरचं कौतुक
KKR Champion : शाहरुख खानने सिनेमा आणि क्रिकेट दोन्ही जिंकले… सचिन, युवी-वीरूकडून केकेआरचं कौतुक (PTI)

कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीगच्या १७व्या हंगामाची ट्रॉफी जिंकली आहे. केकेआरने अंतिम फेरीत सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव करत तिसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचा पराक्रम केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात केकेआरने यंदा अप्रतिम कामगिरी केली. या मोसमात केकेआर समोर जो कोणता संघ आला त्याला चिरडत त्यांनी आयपीएल ट्रॉफी जिंकली. श्रेयस अय्यरने कर्णधार म्हणून पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे.

केकेआर चॅम्पियन होताच सोशल मीडियावर अनेक क्रिकेटपटूंनी टीमला खास शुभेच्छा दिल्या.

सचिन तेंडुलकचं ट्वीट

केकेआरने किती सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यांच्या फलंदाजांनी त्यांच्या मोहिमेची सुरुवात धमाकेदारपणे केली होती, परंतु स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात गोलंदाजांनीच शो आपल्या नावे केला. अंतिम फेरीत त्यांच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. विकेट्स घेतल्या आणि धावांचा पाठलाग सोपा केला. तुमच्या फ्रँचायझीसाठी तिसरी ट्रॉफी जिंकल्याबद्दल सर्व खेळाडूंचे आणि कोचिंग स्टाफचे अभिनंदन. सचिनने आपल्या ट्विटमध्ये गौतम गंभीर आणि शाहरुख खानला टॅग केले.

 

युवराज सिंग

युवराज सिंगने त्याच्या एक्सवर लिहिले की, आयपीएलच्या १७व्या सीझनचा चॅम्पियन बनल्याबद्दल केकेआरचे अभिनंदन. संपूर्ण मोसमात केकेआरची कामगिरी अप्रतिम होती. हैदराबाद संघानेही चमकदार कामगिरी केली, मात्र आज ज्या संघाने आश्चर्यकारक कामगिरी केली तोच संघ विजेता ठरला. गौतम गंभीरसाठी खास शूटआउट कारण कोणतीही भीती न बाळगता अप्रतिम मार्गदर्शन करणाऱ्या आणि सर्वांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या शाहरुख खानने आज सिनेमा आणि क्रिकेट दोन्ही जिंकले.

विरेंद्र सेहवाग

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने फिल्मी शैलीत IPL २०२४चे विजेतेपद जिंकल्याबद्दल KKR चे अभिनंदन केले. सेहवागने X वर लिहिले की, तिसरे विजेतेपद जिंकल्याबद्दल केकेआरचे अभिनंदन. शाहरुख खानच्या डायलॉगप्रमाणे, “किसी चीज को अगर चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने की कोशिश करती है”.

याचे विशेष श्रेय श्रेयस अय्यरला जाते, ज्याने शानदार कर्णधारपद सांभाळले. केवळ कर्णधारपदच नाही, तर क्षेत्ररक्षण आणि त्याचे मनसुबे सगळेच यशस्वी ठरले. आधी नेहराजी आणि आता गौतम गंभीर हे मार्गदर्शक बनले आणि संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मदत केली हे पाहून बरे वाटले. वेलडन टीम

केकेआर तिसऱ्यांदा चॅम्पियन

विशेष म्हणजे केकेआर तिसऱ्यांदा आयपीएलचा चॅम्पियन बनला आहे. या संघाने २०१२ मध्ये पहिल्यांदा विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर २०१४ मध्ये तो जिंकला. आता संघ १० वर्षानंतर २०२४ मध्ये चॅम्पियन बनला आहे.

केकेआरकडून सुनील नरेनने या मोसमात दमदार कामगिरी केली. त्याने १५ सामन्यात ४८८ धावा केल्या आणि १९ विकेट घेतल्या. त्याने १ शतक आणि ३ अर्धशतके झळकावली. नरेनसह फिलिप सॉल्टनेही चांगली कामगिरी केली. त्याने १२ सामन्यात ४३५ धावा केल्या. सॉल्टने ४ अर्धशतके झळकावली.

टी-२० वर्ल्डकप २०२४