बीआर चोप्रा यांच्या 'महाभारत' या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. या मालिकेत रुपा गांगुलीने द्रौपदीची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे रुपाला प्रसिद्धी मिळाली होती. पण खासगी आयुष्यात मात्र तिला अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते.
रुपाने पतीसाठी तिचे संपूर्ण करिअर सोडले. तिने इंडस्ट्रीला रामराम ठोकत कोलकातामध्ये शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला.