मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  मी माझ्या गर्लफ्रेंडला आयपीएलमध्ये आणू शकतो का? जेव्हा केकेआरच्या खेळाडूने गौतम गंभीरला विचारले, पाहा

मी माझ्या गर्लफ्रेंडला आयपीएलमध्ये आणू शकतो का? जेव्हा केकेआरच्या खेळाडूने गौतम गंभीरला विचारले, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 30, 2024 03:02 PM IST

आयपीएल २०२४ जिंकल्यानंतर केकेआर संघातील खेळाडूंचे मजेशीर किस्से बाहेत येत आहेत. असाच एक नवा किस्सा आता समोर आला आहे. हा किस्सा केकेआरचा सर्वात महत्वाचा खेळाडू सुनील नरेनचा आहे.

मी माझ्या गर्लफ्रेंडला आयपीएलमध्ये आणू शकतो का? जेव्हा केकेआरच्या खेळाडूने गौतम गंभीरला विचारले, पाहा
मी माझ्या गर्लफ्रेंडला आयपीएलमध्ये आणू शकतो का? जेव्हा केकेआरच्या खेळाडूने गौतम गंभीरला विचारले, पाहा (PTI)

आयपीएल २०२४ संपले आहे. या स्पर्धेत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. आयपीएल २०२४ नंतर अनेक खुलासे होत आहेत. केकेआर संघातील खेळाडूंचे मजेशीर किस्से बाहेत येत आहेत. असाच एक नवा किस्सा आता समोर आला आहे. हा किस्सा केकेआरचा सर्वात महत्वाचा खेळाडू सुनील नरेनचा आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आयपीएल २०२४ चे जेतेपद पटकावल्यानंतर कोलकाता नाइट रायडर्सचा मार्गदर्शक गौतम गंभीरने स्टार अष्टपैलू सुनील नरेनचे कौतुक केले आहे. नरेनने फ्रेंचायझीला इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकण्यास मदत केली. नरेनची आयपीएल २०२४ चा सर्वात मौल्यवान खेळाडू म्हणून निवड झाली. KKR ने अंतिम फेरीत सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला.

सुनील नरेने आयपीएल २०२४ मध्ये ४८८ धावा केल्या आणि १७ विकेट्स घेतल्या.

दरम्यान, नुकत्याच एका मुलाखतीत, गंभीरने सुनील नरेनसोबतच्या त्याच्या मैत्रीबद्दल सांगितले आहे. २०१२ आणि २०१४ मध्ये गंभीर कॅप्टन असताना कोलकाताने आयपीएल जिंकले होते. त्यावेळीही नरेनने महत्वाची भुमिका बजावली होती.

आयपीएलमध्ये गर्लफ्रेंडला आणू का?

आता एका मुलाखतीत गंभीर म्हणाला, 'नरेन आणि मी सारखेच आहोत आणि आमच्या भावनाही सारख्याच आहेत. २०१२ मध्ये नरेन पहिल्यांदा आयपीएलमध्ये आला तेव्हा तो जयपूरमध्ये होता आणि आम्ही सरावासाठी जात होतो, हे मला अजूनही आठवतं.

गौती पुढे म्हणाला, मी त्याला जेवणासाठी यायला सांगितले होते. तो इतका लाजाळू होता की त्याने लंच दरम्यान एक शब्दही बोलला नाही आणि शेवटी त्याने पहिला प्रश्न विचारला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आयपीएलमध्ये बोलावू शकतो का?

नरेन पहिल्या सत्रात तो खूप शांत होता, पण आता आपण (गंभीर आणि नरेन) कोणत्याही विषयावर बोलू शकतो. तो माझ्यासाठी भावासारखा आहे. मी त्याच्याकडे एक मित्र किंवा सहकारी म्हणून पाहत नाही, मी त्याच्याकडे एक भाऊ म्हणून पाहतो.'

मी नरेनसाठी फक्त एक कॉल दूर आहे- गंभीर

त्यांच्यातील नात्याबद्दल गंभीर म्हणाला, की जर मला त्याची किंवा त्याला माझी गरज भासली तर आम्ही फक्त कॉल दूर आहोत, आम्ही अशा प्रकारचे नाते निर्माण केले आहे. आम्ही फार उत्साही होत नाही. आम्ही खूप भावना दाखवत नाही. आम्ही दिखावा करत नाही, आम्ही फक्त आमचे काम करतो आणि परत येतो."

टी-२० वर्ल्डकप २०२४