Fire at Mumbai central tardeo industrial estate : मुंबई सेंट्रल भागात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ताडदेव वाल्मिकीवाडी परिसरातील औद्योगिक वसाहतीत भीषण आग लागल्याने कामगारांची पळापळ झाली. अग्निशमन दलाच्या ७ ते ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. आग इतकी भीषण आहे की, दुरवरून आगीच्या ज्वाला दिसत आहेत. परिसरात धुराचे साम्राज्य असून आग परिसरातील कंपन्या व गोदामात पसरत आहे. शुक्रवारी ९ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.
झेप्टो हब नावाच्या कंपनीच्या गोदामाला ही आग लागली आहे. गोदामाच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली. गोदामात प्लॅस्टीकचे सामान असल्याने आगीचा भडका उडाला व इतरस्त्र पसरली. परिसरात धुराचे लोट दिसत असून अग्निशमन गाड्या व १०८ रुग्णवाहिकाही घटनास्थली दाखल झाल्या आहेत. सदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मुंबई सेंट्रल येथे ताडदेव भागात वाल्मिकीवाडी वाडी, गवालिया टँक भागात ही आग लागली आहे. आगीची सूचना मिळताच फायर ब्रिगेडच्या सात गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीत कुठल्याही प्रकारच्या जीवितहानीने वृत्त समोर आले नाही किंवा जखमी झाले नाही. अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
धारावी परिसरातील काळा किला येथे असलेल्या अशोक मिल कंपाऊंडमधील तीन मजली आणि चार मजली इमारतींना मंगळवारी पहाटे ३.४५ च्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले आणि चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. जखमींना तातडीने बीएमसीच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डोंबिवली केमिकल फॅक्टरीत झालेल्या स्फोटात दहा जणांचा मृत्यू झाला असून ६० हून अधिक जण जखमी झाले. डोंबिवली एमआयडीसीच्या फेज २ मधील अमुदन केमिकल्समध्ये बॉयलरचा स्फोट आणि त्यानंतर लागलेल्या आगीत गुरुवारी नऊ जणांचा मृत्यू झाला, तर ६० हून अधिक जण जखमी झाले.