आयपीएल २०२४ चा अंतिम सामना २६ मे रोजी खेळला गेला. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या आयपीएल फायनलमध्ये कोलकाताने हैदराबादविरुद्ध सहज विजय मिळवला. या विजयानंतर रिंकू सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो व्लॉगरच्या भूमिकेत दिसत आहे.
रिंकू सिंग भारतीय क्रिकेटमधील सर्वात आवडत्या खेळाडूंपैकी एक आहे. रिंकूचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये तो कोणाचीही पर्वा न करता मनात येईल ते बोलतो. आता त्याच्या संघाने आयपीएल २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे. कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला हरवून आयपीएल ट्रॉफी जिंकली. रिंकू ७ वर्षांपासून केकेआर संघासोबत आहे. त्याची ही पहिली आयपीएल ट्रॉफी आहे.
आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर रिंकू सिंग व्लॉगर बनला. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रिंकूसोबत नितीश राणा, नितीशची पत्नी साची मारवाह आणि अनुकुल रॉय दिसत आहेत. व्हिडिओ सुरू होताच, रिंकू सिंग म्हणतो, नमस्कार मित्रांनो नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. मग साची आणि नितीश रिंकूला सबस्क्राईब करायला सांगतात. मग रिंकू म्हणतो, हाय गाइज सबस्क्राईब करा आणि बेल बटण दाबा.
कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज रिंकू सिंगसाठी आयपीएल २०२४ काही खास नव्हते. रिंकूने २०२३ च्या मोसमात बॅटिंगने स्वतःचे नाव कमावले. पण या मोसमात केकेआरला त्याची फारशी गरज भासली नाही. गेल्या मोसमात रिंकूला आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावरच भारतीय संघात प्रवेश मिळाला होता. तिथेही त्याची कामगिरी अप्रतिम होती.
रिंकू सिंगला टी-२० विश्वचषकासाठी राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे. १५ सदस्यीय संघाव्यतिरिक्त ४ राखीव खेळाडू आहेत. यात रिंकू व्यतिरिक्त शुभमन गिल, आवेश खान आणि खलील अहम यांचा समावेश आहे. या १९ खेळाडूंमध्ये रिंकू हा एकमेव खेळाडू आहे, जो यंदा आयपीएल फायनल खेळला आहे.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने ११३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कोलकाताने १०.३ षटकांत २ गडी गमावून लक्ष्य गाठले. कोलकात्याच्या विजयानंतर खेळाडूंनी जोरदार डान्स केला. खेळाडूंसोबतच मार्गदर्शक गौतम गंभीरही खूप आनंदी दिसला.
विशेष म्हणजे केकेआर तिसऱ्यांदा आयपीएलचा चॅम्पियन बनला आहे. या संघाने २०१२ मध्ये पहिल्यांदा विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर २०१४ मध्ये तो जिंकला. आता संघ १० वर्षानंतर २०२४ मध्ये चॅम्पियन बनला आहे.
संबंधित बातम्या