yashasvi jaiswal hit most sixes in a test inning : यशस्वी जैस्वालने सलग दुसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावले आहे. याआधी यशस्वीने विशाखापट्टणम कसोटीच्या पहिल्या डावातही २०९ धावा केल्या होत्या. आता सलग दुसऱ्या कसोटीत दुहेरी शतक झळकावून त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की त्याला भविष्यातील स्टार का मानले जात आहे.
यशस्वी जैस्वालने राजकोट कसोटीच्या दुसऱ्या डावात २१४ धावांची खेळी खेळली. त्याने २३४ चेंडूत १४ चौकार आणि १२ षटकार मारले.
२२ वर्षांचा यशस्वी जैस्वाल ज्याला स्पर्श करत आहे, त्याचे सोने होताना दिसत आहे. जैस्वालची बॅटधावा करत नाही तर आग ओकत आहे. सध्या तो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे.
सोबतच या सामन्यातून जैस्वालने एका कसोटी डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. कसोटीत एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वसीम अक्रमच्या नावावर आहे. अक्रमने १९९६-९७ मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटीत २५७ धावांच्या खेळीत १२ षटकार मारले होते.
विशेष म्हणजे जैस्वालने चालू मालिकेत आतापर्यंत २० षटकार मारले आहेत. यासह तो कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. तसेच, जैस्वालने आतापर्यंत ७ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने २५ षटकार मारले आहेत.
जैस्वालने आतापर्यंत ६७ कसोटी खेळल्या आहेत, ज्यात त्याने १३ डावांमध्ये ७१.७५ च्या सरासरीने ८६१ धावा केल्या आहेत. या दरम्यान, त्याने ३ शतके आणि २ अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या २१४ धावा आहे.