टी-20 वर्ल्डकप २०२४ पूर्वी भारत आणि बांगलादेश यांच्यात सराव सामना खेळला जात आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर भारताने २० षटकात ५ बाद १८२ धावा केल्या आहेत.
भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने ३२ चेंडूत ५३ धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि ४ षटकार मारले. या झंझावाती खेळीनंतर ऋषभ पंत निवृ्त्त झाला. यानंतर सूर्यकुमार यादवने १८ चेंडूत ३१ धावांची चांगली खेळी केली. तर सलामीवीर आणि भारतीय कर्णधार रोहित शर्माने १९ चेंडूत २३ धावा करून बाद झाला.
बांगलादेशच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर शरीफुल इस्लाम याच्यासह महमुदुल्ला, मेहंदी हसन आणि तनवीर इस्लाम यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मासोबत सलामीला आलेला संजू सॅमसन ६ चेंडूत १ धावा काढून बाद झाला. टीम इंडियाला पहिला झटका ११ धावांवर बसला. मात्र, यानंतर रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांच्यात चांगली भागीदारी झाली. या दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली.
त्याचवेळी शिवम दुबे १६ चेंडूत १४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये गेला. मात्र, टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पंड्याने स्फोटक फलंदाजीचे प्रदर्शन केले. भारतीय संघाच्या अष्टपैलू खेळाडूने २३ चेंडूत ४० धावा केल्या. त्याने आपल्या स्फोटक खेळीत ४ षटकार आणि २ चौकार लगावले.
तर शिवम दुबेने १६ चेंडूत १४ धावा केल्या. तो झेलबाद झाला. तर रविंद्र जडेजाने नाबाद ६ चेंडूत ४ धावा केल्या.
संबंधित बातम्या