HDFC Bank Card Service Close : जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे (HDFC Bank) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. ४ जून आणि ६ जून २०२४ रोजी १२.३० ते २.३० वाजेपर्यंत तुम्ही अनेक बँकिंग सेवांचा वापर करू शकणार नाही. बँकेने याबाबत आपल्या ग्राहकांना सूचित करताना निवदेन दिले आहे की, या कालावधीत कार्डशी संबंधित अनेक सेवा अस्थाई रित्या उपलब्ध नसतील.
देशातील सर्वोत मोठी प्रायव्हेट लेंडर- HDFC बँक सतत आपल्या कस्टर्सच्या यूजर एक्सपीरियंसमध्ये सुधारणा करण्यासाठी सिस्टम अपग्रेड करत आहे. यामुळे काही वेळासाठी बँकेचे डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्डाची सेवा प्रभावित होतील. बँकेने कस्टमर्सना मेल व एसएमएस करून याबाबत माहिती दिली आहे.
HDFC बँकेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्डाच्या सेवा ४ जून आणि ६ जून रोजी बंद राहतील. बँक ४ जून (मंगळवार) रोजी डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्ड सर्विसेज अपग्रेड करणार आहे. यामुळे सर्व एटीएम विड्रॉल, POS, ऑनलाइन आणि नेटसेफ ट्रान्जेक्शन प्रभावित होतील. हे सिस्टम अपग्रेड दुपारी १२:३० ते दुपारी २:३० पर्यंत चालेल.
तसेच, ६ जून रोजीही HDFC बँक डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्ड्स संबंधित सिस्टमला अपग्रेड करणार आहे. यामुळे रुपे आणि नेटसेफसाठी सर्व ऑनलाइन ट्रांजेक्शनवर परिणाम होईल. हेह सिस्टम अपग्रेडही दुपारी १२.३० ते दुपारी २.३० पर्यंत सुरू राहील.
बँकेने म्हटले की, ग्राहकांचा बँकिंग अनुभव सुधारण्यासाठी सिस्टम अपग्रेड केली जाणार आहे. यामुळे एचडीएफसी बँक डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्ड सेवा सुधारणार आहेत. यामुळे दोन दिवस कार्डशी संबंधित सेवा जवळपास टप्प राहतील.
एचडीएफ बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, या अपग्रेड कालावधीत एचडीएफसी बँक डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्डशी संबंधित सेवा अस्थाई रुपाने उपलब्ध असणार नाहीत. बँकेने सर्व ग्राहकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही असुविधेपासून वाचण्यासाठी यावेळी कोणतेही कार्ड ट्रांजेक्शन आधीच प्लान करा.
HDFC बँकेने पेमेंटशी संबंधित कोणत्याही समस्येसंदर्भात तक्रारीसाठी हेल्पलाइन नंबर 1800 1600 / 1800 2600 जारी केला आहे. हा नंबर भारतीय ग्राहकांसाठी आहे. तसेच परदेशात राहणाऱ्या ग्राहकांसाठी 022-61606160 हा नंबर जारी केला आहे.
याआधी HDFC बँकेने २२ आणि २५ मे रोजीही आपली सिस्टम अपग्रेड केली होती. त्यावेळी बँकेची नेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग सर्विस प्रभावित झाली होती. त्याचबरोबर कार्ड सर्विसवरही परणाम झाला होता. बँकेने त्या शेड्यूल्ड मेंटन्सची माहिती ग्राहकांना SMS च्या माध्यमातून दिली होती.
संबंधित बातम्या