IND vs BAN Warm Up Match : टीम इंडिया वर्ल्डकपसाठी सज्ज, सराव सामन्यात बांगलादेशला सहज लोळवलं
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs BAN Warm Up Match : टीम इंडिया वर्ल्डकपसाठी सज्ज, सराव सामन्यात बांगलादेशला सहज लोळवलं

IND vs BAN Warm Up Match : टीम इंडिया वर्ल्डकपसाठी सज्ज, सराव सामन्यात बांगलादेशला सहज लोळवलं

Jun 01, 2024 11:40 PM IST

ind vs ban warm up match highlights : टी-20 वर्ल्डकप २०२४ च्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशचा ६२ धावांनी पराभव केला. हा सामना न्यूयॉर्कच्या नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला.

IND vs BAN Warm Up Match : टीम इंडिया वर्ल्डकपसाठी सज्ज, सराव सामन्यात बांगलादेशला सहज लोळवलं
IND vs BAN Warm Up Match : टीम इंडिया वर्ल्डकपसाठी सज्ज, सराव सामन्यात बांगलादेशला सहज लोळवलं

ind vs ban warm up match scorecard : टी-20 वर्ल्डकप २०२४ पूर्वी भारत आणि बांगलादेश यांच्यात सराव सामना खेळला गेला. न्यूयॉर्कच्या नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर भारताने २० षटकात ५ बाद १८२ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशला २० षटकात ९ बाद १२१ धावाच करता आल्या.

बांगलादेशकडून महमुदुल्लाहने २८ चेंडूत ४० धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि १ षटकार लगावला. तर शाकिब अल हसनने ३४ चेंडूत २८ धावा केल्या. याशिवाय सौम्या सरकार, तनजीद हसनलिटन दास. नजमुल हसन शांतौ आणि तौहीद हृदय या फलंदाजांनी निराशा केली.

भारतीय संघाच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर अर्शदीप सिंग आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. याशिवाय जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

भारताचा डाव

भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने ३२ चेंडूत ५३ धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि ४ षटकार मारले. या झंझावाती खेळीनंतर ऋषभ पंत निवृ्त्त झाला. यानंतर सूर्यकुमार यादवने १८ चेंडूत ३१ धावांची चांगली खेळी केली. तर सलामीवीर आणि भारतीय कर्णधार रोहित शर्माने १९ चेंडूत २३ धावा करून बाद झाला.

बांगलादेशच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर शरीफुल इस्लाम याच्यासह महमुदुल्ला, मेहंदी हसन आणि तनवीर इस्लाम यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

रोहितसोबत संजू सॅमसन सलामीला आला

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मासोबत सलामीला आलेला संजू सॅमसन ६ चेंडूत १ धावा काढून बाद झाला. टीम इंडियाला पहिला झटका ११ धावांवर बसला. मात्र, यानंतर रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांच्यात चांगली भागीदारी झाली. या दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली.

त्याचवेळी शिवम दुबे १६ चेंडूत १४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये गेला. मात्र, टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पंड्याने स्फोटक फलंदाजीचे प्रदर्शन केले. भारतीय संघाच्या अष्टपैलू खेळाडूने २३ चेंडूत ४० धावा केल्या. त्याने आपल्या स्फोटक खेळीत ४ षटकार आणि २ चौकार लगावले.

तर शिवम दुबेने १६ चेंडूत १४ धावा केल्या. तो झेलबाद झाला. तर रविंद्र जडेजाने नाबाद ६ चेंडूत ४ धावा केल्या. अशा प्रकारे भारताने २० षटकात ५ बाद १८२ धावा केल्या होत्या.

Whats_app_banner

संबंधित बातम्या