Anxiety Attack: रात्रीची झोप खराब करू शकते एंग्जायटीची समस्या, या मार्गांनी करा स्वतःला शांत
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Anxiety Attack: रात्रीची झोप खराब करू शकते एंग्जायटीची समस्या, या मार्गांनी करा स्वतःला शांत

Anxiety Attack: रात्रीची झोप खराब करू शकते एंग्जायटीची समस्या, या मार्गांनी करा स्वतःला शांत

Jun 01, 2024 11:39 PM IST

Mental Health Tips: चिंता ही एक अतिशय गंभीर समस्या आहे. ही एक मानसिक स्थिती आहे जी बऱ्याच लोकांना प्रभावित करते. येथे जाणून घ्या एंग्जायटी अटॅक शांत करण्याचे मार्ग.

एंग्जायटी अटॅक शांत करण्याचे मार्ग
एंग्जायटी अटॅक शांत करण्याचे मार्ग (unsplash)

Ways to Calm Anxiety Attack: आजकाल चिंता ही एक सामान्य समस्या बनली आहे. तुमच्या आजूबाजूला चिंताग्रस्त व्यक्ती असण्याची शक्यता जास्त आहे. बऱ्याच वेळा लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो, परंतु त्यांना हे समजून घेणे कठीण होऊ शकते. बहुतेक लोकांना रात्री झोपण्यापूर्वी एंग्जायटी अटॅक येतात. कारण अशा वेळी अनेक प्रकारचे विचार मनात येत राहतात. बहुतेक लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो. एकदा एखाद्याला एंग्जायटी अटॅक आला की त्याला हाताळणे कठीण होते. मात्र काही टिप्स फॉलो करून ही समस्या दूर होऊ शकते.

एंग्जायटी अटॅक टाळण्यासाठी काय करावे?

पोटातून श्वास घ्या

चिंता टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पोटातून श्वास घेणे सुरू करणे. यासाठी एक हात छातीवर आणि दुसरा पोटावर ठेवा. तुमच्या नाकातून श्वास घ्या, तुमचे पोट तुमच्या छातीपेक्षा वर नेण्याचा प्रयत्न करा. तोंडातून हळूहळू श्वास सोडा आणि नंतर असे पुन्हा करा.

स्ट्रेचिंग आणि मूव्हमेंट

स्ट्रेचिंग हे फक्त वर्कआऊटच्या आधी किंवा नंतरच नाही तर ते तुमच्या शरीरातील चिंतेमुळे निर्माण होणारा ताणही कमी करू शकते. तुमची मान, खांदे आणि पाठ स्ट्रेच केल्याने त्या तणावातून आराम मिळतो आणि तुम्हाला निरोगी राहण्याची नवीन भावना मिळते.

ध्यान

मेडिटेशन केल्याने चिंतेचा सामना करण्यास मदत होते. ज्यामुळे तणावाचे परिणाम कमी होतात. दररोज ध्यान केल्याने चिंता टाळता येते.

आंघोळ करा

गरम पाण्याने आंघोळ केल्याने स्नायूंचा ताण कमी होतो आणि तुम्ही तुमच्या धावणाऱ्या विचारांऐवजी तुमच्या त्वचेवर लक्ष केंद्रित करू शकता. तुमच्याकडे आंघोळ करण्याचा पर्याय नसल्यास तुमच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडल्याने तुमच्या हृदयाची गती कमी होण्यास मदत होऊ शकते.

म्युझिक ऐका

गाणे ऐकल्याने तुमचा मूड त्वरित बदलण्यास मदत होते. तुम्हाला शांत करणाऱ्या आणि तुम्हाला शांत वाटणाऱ्या गाण्यांची प्लेलिस्ट बनवा. तुमच्या आवडीचे संगीत ऐका. ते हॅपी म्युझिक असल्याचा प्रयत्न करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner