सामन्याची चांगली सुरुवात सलामीच्या चांगल्या भागीदारीने होते आणि चाहत्यांना मजाही तेव्हाच येते जेव्हा सलामीवीर फलंदाज पॉवरप्लेमध्ये स्फोटक फलंदाजी करून मनोजरंजन करतात.
अशा स्थितीत, या टी-20 वर्ल्डकपमध्ये अशा ४ सलामीच्या जोडी आहेत, ज्या आपल्या स्फोटक फलंदाजीने आणि भागीदारीने सामना पॉवरप्लेमध्येच एकतर्फी करू शकतात.
फिल सॉल्ट आणि जॉस बटलर: पाकिस्तानविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या सामन्यात सॉल्ट आणि बटलरने केवळ ३८ चेंडूत ८२ धावांची भागीदारी केली आणि संघाला १५८ धावांचे सोपे लक्ष्य गाठण्यात मदत केली. ९ टी20 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये या जोडीने ६१.५५ च्या सरासरीने ५५४ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये डिसेंबर २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ११७ धावांची सर्वोत्तम भागीदारी आहे.
रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल: T20 विश्वचषकातील सर्वोत्तम सलामीच्या जोडींपैकी एक रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी कसोटी सामन्यांमध्ये ६१.२५ च्या सरासरीने ९८० धावा जोडल्या आहेत. गेल्या ३ T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जयस्वालने १३२ धावा केल्या आहेत, तर रोहितने १२१ धावा केल्या आहेत.
डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेड: डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेड विश्वचषक २०२३ च्या बाद फेरीत सलामीला दिसले. यावर्षी दोघेही न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत एकत्र फलंदाजीसाठी आले होते. विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात या जोडीने केवळ ३७ चेंडूत ६० धावा केल्या होत्या.
ब्रँडन किंग आणि जॉन्सन चार्ल्स: ब्रँडन किंग आणि जॉन्सन चार्ल्स वेस्ट इंडिजसाठी उत्कृष्ट आणि मजबूत सलामीवीर सिद्ध होऊ शकतात. ब्रँडन किंगने त्याच्या ५० टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १३४.९ च्या स्ट्राइक रेटने १३०९ धावा केल्या आहेत. यामध्ये १० अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ८५ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. तर जॉन्सन चार्ल्सने ५१ आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये १३३ च्या स्ट्राइक रेटने ११६२ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ अर्धशतके आणि १ शतकाचा समावेश आहे. जॉन्सन चार्ल्सची सर्वोत्तम धावसंख्या ११८ धावा आहे.