What Is ICC Stop Clock Rule : आयपीएलच्या गेल्या मोसमात इम्पॅक्ट प्लेयर नियम लागू करण्यात आला होता. या नियमानुसार, सामन्याच्या मध्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये एका खेळाडूची बदली शक्य आहे.
BCCI आणि ICC सतत क्रिकेटच्या नवीन नियमांवर काम करत असतात, जेणेकरून खेळ चाहत्यांसाठी आणखी मजेदार बनवता येईल.
दरम्यान, २ जूनपासून टी-20 विश्वचषक २०२४ खेळला जाणार आहे या स्पर्धेपूर्वी एक मोठी माहिती समोर येत आहे.
वास्तविक, ICC T20 वर्ल्ड कपमध्ये स्टॉप क्लॉक नियम लागू करण्यास तयार आहे. पण स्टॉप क्लॉकचा नियम नेमका काय आहे? हे तुम्हाला माहिती आहे का?
हा नियम लागू झाल्यानंतर क्रिकेटमध्ये किती बदल होणार? वास्तविक, स्टॉप क्लॉक नियम लागू झाल्यानंतर, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला नवीन षटक सुरू करण्यासाठी केवळ ६० सेकंद मिळणार आहेत.
उदाहरणार्थ, एखाद्या संघाच्या गोलंदाजाने त्याचे षटक पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या गोलंदाजाला त्याचे षटक सुरू करण्यासाठी केवळ ६० सेकंद मिळणार आहेत. ६० सेकंदात तो नवीन षटक सुरू करू शकला नाही. तर विरोधी संघाला ५ धावा दिल्या जाणार आहेत.
थर्ड अंपायर ६० सेकंदांचा टायमर सेट करतील, जेणेकरून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा कोणताही गैरसमज होऊ नये आणि योग्य वेळी ओव्हर सुरू करता येईल.
पण जर विरोधी संघ निर्धारित ६० सेकंदात दुसरे षटक सुरू करू शकला नाही तर काय होईल? वास्तविक, असे झाल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मोठी किंमत मोजावी लागेल. त्याबदल्यात फलंदाजी करणाऱ्या संघाला पेनल्टी म्हणून ५ धावा मिळतील. मात्र, त्याआधी पंच संबंधित संघाला २ वेळा वॉर्निंग देतील.
मात्र तिसऱ्यांदा चूक झाल्यास विरोधी संघाला ५ अतिरिक्त धावा मिळतील. तथापि, स्टॉप क्लॉक नियम लागू झाल्यानंतर टी-20 स्वरूप किती बदलते हे पाहणे मनोरंजक असेल?
संबंधित बातम्या