Most Sixes in T20 WC : टी-20 विश्वचषकात सर्वाधिक षटकार कोणत्या संघाने मारले? भारताचा नंबर कितवा? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Most Sixes in T20 WC : टी-20 विश्वचषकात सर्वाधिक षटकार कोणत्या संघाने मारले? भारताचा नंबर कितवा? जाणून घ्या

Most Sixes in T20 WC : टी-20 विश्वचषकात सर्वाधिक षटकार कोणत्या संघाने मारले? भारताचा नंबर कितवा? जाणून घ्या

Updated Jun 01, 2024 08:04 PM IST

T20 World Cup 2024 : पहिला टी-20 वर्ल्डकप २००७ मध्ये खेळला गेला होता. या १७ वर्षांत या स्पर्धेत अनेक मोठे विक्रम झाले. पण तुम्हाला माहित आहे का की T20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या एका मोसमात कोणत्या संघाने सर्वाधिक षटकार मारले आहेत?

Most Sixes in T20 World Cup : टी-20 विश्वचषकात सर्वाधिक षटकार कोणत्या संघाने मारले? भारताचा नंबर कितवा? जाणून घ्या
Most Sixes in T20 World Cup : टी-20 विश्वचषकात सर्वाधिक षटकार कोणत्या संघाने मारले? भारताचा नंबर कितवा? जाणून घ्या

Most Sixes By A Team In Single T20 World cup 2024: टी-20 विश्वचषक २०२४ रविवार (२ जून) सुरू होत आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचा अंतिम सामना २९ जून रोजी होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ५ जूनला आयर्लंडविरुद्धच्या विश्वचषक मोहिमेला सुरुवात करेल. याआधी टीम इंडिया शनिवारी बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळणार आहे.

वास्तविक, पहिला टी-20 वर्ल्डकप २००७ मध्ये खेळला गेला होता. या १७ वर्षांत या स्पर्धेत अनेक मोठे विक्रम झाले. पण तुम्हाला माहित आहे का की T20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या एका मोसमात कोणत्या संघाने सर्वाधिक षटकार मारले आहेत?

एका टी-20 विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाने एका टी-20 विश्वचषकात विक्रमी २३९ षटकार मारले होते. त्याचबरोबर पाकिस्तान ऑस्ट्रेलियानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानने विक्रमी २२० षटकार मारले होते.

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्ताननंतर वेस्ट इंडिज तिसऱ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजच्या नावावर एका टी-20 विश्वचषकात २१९ षटकार मारण्याचा विक्रम आहे. या संघांनंतर इंग्लंडचा क्रमांक लागतो. एका टी-20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने २१६ षटकार मारले आहेत.

या यादीत टीम इंडिया कुठे आहे?

तर, भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर ते या यादीत सहाव्या स्थानावर आहेत. एका T20 विश्वचषकात भारतीय संघाने २०७ षटकार मारले आहेत. टीम इंडियानंतर श्रीलंकेचा क्रमांक आहे. या संघाने T20 विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत २०० षटकार ठोकले आहेत. तर श्रीलंकेनंतर न्यूझीलंडचा क्रमांक लागतो. T20 विश्वचषकाच्या एका आवृत्तीत किवी संघाने १९६ षटकार ठोकले आहेत. या यादीत दक्षिण आफ्रिका आठव्या स्थानावर आहे.

दक्षिण आफ्रिकेने T20 विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत १८६ षटकार मारले आहेत. बांगलादेशचा संघ १४२ षटकारांसह नवव्या स्थानावर आहे. तर अफगाणिस्तान १०९ षटकारांसह दहाव्या स्थानावर आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या