या ऑनस्क्रीन फिल्मी खलनायकांनी आपल्या मुलांना आणि कुटुंबाला प्रसिद्धीपासून दूर ठेवले. या लोकप्रिय खलनायकांच्या मुलांना बघुया, ज्यांना फार कमी लोक ओळखतात.
‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटामध्ये ‘मोगॅम्बो’ असो किंवा कोयलाचे ‘राजा साब’ असो अमरीश पुरी यांनी आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांवर जादू केली. अनेक दशके इंडस्ट्रीत राहून त्यांनी अनेक उत्तम चित्रपट केले. पण, अभिनेत्याचा मुलगा राजीव पुरी इंडस्ट्रीत आपली छाप पाडू शकला नाही. त्यानेअखेर मरीन नेव्हिगेटर म्हणून काम केले.
चित्रपटांमध्ये खलनायक बनलेल्या रणजीत यांची दरारा इतका मोठा होता की, खऱ्या आयुष्यातही मुली त्यांच्यापासून दूर पळून जायच्या. आता त्यांचा मुलगा चिरंजीव, ज्याला लोक जीवा म्हणून ओळखतात. त्यानेही चित्रपटांमध्ये प्रवेश केला आहे. हा अभिनेता विकी कौशल आणि कियारा अडवाणी यांच्या ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात दिसला होता.
शक्ती कपूरप्रमाणेच त्यांची दोन्ही मुले, मुलगी श्रद्धा कपूर आणि मुलगा सिद्धांत यांनी चित्रपटांमध्ये करिअर केले. मात्र, मुलीप्रमाणे मुलगा सिद्धांतला मोठे यश मिळवता आले नाही. 'हसीना पारकर' या चित्रपटात तो श्रद्धाच्या भावाच्या भूमिकेत दिसला होता.
‘बॅडमॅन’ गुलशन ग्रोवरनेही आपल्या नकारात्मक पात्रांनी प्रेक्षकांना घाबरवले आहे. दुसरीकडे, अभिनेत्याचा मुलगा संजय ग्रोव्हरला अभिनयात विशेष रस नाही. सुरुवातीला संजयला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या पण त्याने विशेष रस दाखवला नाही. संजयने बिझनेस ऑफ एंटरटेनमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
अभिनेता रझा मुराद त्यांच्या दमदार आवाजासाठी ओळखले जातात. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या नकारात्मक भूमिकांचेही खूप कौतुक झाले. त्यांचा मुलगा अली मुरादनेही चित्रपटांमध्ये प्रवेश केला. पण, त्याला विशेष ओळख मिळाली नाही. २०२०मध्ये आलेल्या 'ढीठ पतंगे' या चित्रपटात तो झळकला होता.
अभिनेता डॅनीने अनेक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका करून आपला खतरनाक अवतार दाखवला आहे. सनी देओलच्या 'घातक' चित्रपटात खलनायक बनून डॅनीने लोकांना इतके घाबरवले होते की, चित्रपटातील संवाद वर्षानुवर्षे लोकांच्या मनातून आजही पुसले जाऊ शकले नाहीत. त्याचा मुलगा रिंगझिंग डेन्झोंगपाही वडिलांप्रमाणे बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.
'शोले' चित्रपटात साकारलेली गब्बरची भूमिका क्वचितच कोणी विसरू शकेल. हे अविस्मरणीय पात्र अभिनेते अमजद खान यांनी साकारले होते. मात्र, त्यांचा मुलगा शादाबला त्यांच्या वडिलांसारखी ओळख चित्रपटांमध्ये निर्माण करता आली नाही. शादाबने राणी मुखर्जीसोबत ‘राजा की आयेगी बारात’मध्ये मुख्य नायकाची भूमिका साकारली होती. या अभिनेत्याने ‘स्कॅम १९९२’ या वेब सीरिजमध्येही एक छोटीशी भूमिका साकारली होती.