मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cold Coffee Recipe: कॅफेसारखी कोल्ड कॉफी- बनवा घरीच! जाणून घ्या सर्वात सोपी रेसिपी

Cold Coffee Recipe: कॅफेसारखी कोल्ड कॉफी- बनवा घरीच! जाणून घ्या सर्वात सोपी रेसिपी

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Oct 11, 2022 12:13 PM IST

देशभरात कोल्ड कॉफी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. आज आपण कोल्ड कॉफी बनवण्याचा सर्वात सोपा मार्ग सांगणार आहोत.

कोल्ड कॉफी
कोल्ड कॉफी (Freepik)

उन्हाळ्यात वेगवेगळ्या प्रकारची पेयं प्यायला अनेकांना आवडतात. परंतु बाहेरील कोल्ड ड्रिंक्स तुमचे आरोग्य बिघडू शकतात. त्यामुळे घराचं तुम्ही काही मजेदार पेयं बनवू शकता. जर तुम्हाला रोज लस्सी आणि शरबत पिण्याचा कंटाळा आला असेल तर यावेळी तुम्ही कोल्ड कॉफी ट्राय करू शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच त्याची चव आवडेल. देशभरात कोल्ड कॉफी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. आज आपण कोल्ड कॉफी बनवण्याचा सर्वात सोपा मार्ग शिकणार आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

कोल्ड कॉफीसाठी साहित्य

४ चमचे कॉफी पावडर

४ कप फुल क्रीम दूध

बर्फाचे तुकडे

चॉकलेट सिरप (जर तुमच्याकडे चॉकलेट सिरप नसेल तर तुम्ही चॉकलेट मेल्ट करून शकता)

३/४ कप पिठीसाखर

कशी बनवायची कोल्ड कॉफी?

१. सर्व प्रथम, ग्लासमध्ये चॉकलेट सिरप घाला आणि ते फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर कोल्ड कॉफी बनवायला सुरुवात करा.

२. एका कपमध्ये दोन चमचे कोमट पाणी घ्या. त्यात कॉफी घालून मिक्स करा. आता मिक्सरमध्ये दूध, वॉटर व्हीप्ड कॉफी, साखर आणि बर्फाचे तुकडे घेऊन हलवा. फेस येईपर्यंत मिक्सर ढवळत राहा.

३. आता फ्रीजमधून ग्लास काढा आणि त्यात तयार कोल्ड कॉफी ओता. इच्छित असल्यास, वर आणखी चॉकलेट सिरप घाला. तुमची कोल्ड कॉफी तयार आहे.

चॉकलेट सिरप कसं बनवायचं?

जर तुमच्याकडे चॉकलेट सिरप नसेल तर चॉकलेटचे २-३ तुकडे घ्या. त्यात थोडे दूध घालून एक उकळी आणा. नंतर त्यात १ चमचा पाणी घाला आणि मिक्स करा, तुमचे चॉकलेट सिरप तयार आहे.

टीप: येथे नमूद केलेले पदार्थ सहा ग्लास कोल्ड कॉफीसाठी आहेत. आपण आवश्यकतेनुसार सामग्री वाढवू किंवा कमी करू शकता.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग