Good Cholesterol: हृदयाचे आरोग्य राखायचे असेल तर अशा प्रकारे शरीरात वाढवा गुड कोलेस्ट्रॉल
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Good Cholesterol: हृदयाचे आरोग्य राखायचे असेल तर अशा प्रकारे शरीरात वाढवा गुड कोलेस्ट्रॉल

Good Cholesterol: हृदयाचे आरोग्य राखायचे असेल तर अशा प्रकारे शरीरात वाढवा गुड कोलेस्ट्रॉल

May 27, 2024 03:07 PM IST

Healthy Heart: शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू नये म्हणून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवणारे पदार्थ खा. जेणेकरून हृदयाच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही.

शरीरात गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी टिप्स
शरीरात गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी टिप्स

How to Increase Good Cholesterol in Body: कोलेस्ट्रॉलचे नाव घेताच प्रत्येकाला बॅड कोलेस्ट्रॉलची चिंता वाटू लागते. हे शरीरासाठी आणि विशेषतः हृदयाच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. पण बॅड कोलेस्ट्रॉल सोबतच शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल सुद्धा असते. ज्याला हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणतात. शरीराला या चांगल्या कोलेस्टेरॉलची गरज असते. पण जेव्हा शरीरात खराब किंवा बॅड कोलेस्ट्रॉल वाढते तेव्हा एचडीएलचे प्रमाण कमी होते. शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवण्यासाठी हे पदार्थ खाण्यास सुरुवात करा.

गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?

उच्च घनतेचे कोलेस्ट्रॉल क्लिनरसारखे कार्य करते आणि खराब कोलेस्टेरॉल आणि रक्तामध्ये जमा होणारे प्लेक्स काढून टाकते. गुड कोलेस्ट्रॉल धमन्या आणि रक्तवाहिन्यांमध्ये जमा होणारा प्लेक काढून हृदयविकार, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यास मदत करते.

कडधान्य

आहारात संपूर्ण धान्य, कडधान्याचा समावेश केल्यास चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते.

मोनोसॅच्युरेटेड फॅट

मोनोसॅच्युरेटेड फॅट्स हे हेल्दी फॅट्स आहेत आणि एचडीएल वाढवण्यास मदत करतात. इतर हानिकारक फॅट्स ऐवजी या फॅट्सचा समावेश करा. ऑलिव्ह ऑईल, शेंगदाणा तेल, एवोकॅडो, बदाम, हेझलनट्स, पीनट बटर, भोपळ्याच्या बिया, तीळ यांचा आहारात समावेश करा.

सोल्युबल फायबर गुड कोलेस्ट्रॉल वाढवते

ओट्स, फळे, भाज्या, कडधान्ये यामध्ये असलेले सोल्युबल फायबर चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतात. अभ्यासानुसार सोल्युबल फायबर बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते.

ओमेगा ३ फॅटी अॅसिड

ओमेगा ३ फॅटी अॅसिड समृध्द आहार ज्यामध्ये अक्रोड आणि फ्लेक्स सीड्स यांचा समावेश होतो. हे खाल्ल्याने शरीराला ओमेगा ३ चा पुरवठा होतो. जे एचडीएल पातळी वाढवते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी धोका कमी करते.

कॅल्शियम

अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की कॅल्शियम सप्लिमेंट्स एचडीएलच्या उच्च पातळीसह कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतात

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner