Raw Mango Instant Recipe: कच्ची कैरी चवीला अप्रतिम लागते. लोक या कैरीपासून सहसा लोणचे तयार करतात किंवा त्यावर मीठ आणि तिखट टाकून खातात. लोणचे बनवायला खूप वेळ लागत असला तरी तुम्ही इंस्टंट लोणचे सुद्धा बनवू शकता. याशिवाय कैरीपासून विविध प्रकारचे पदार्थ तयार करता येतात. येथे जाणून घ्या कच्च्या कैरीपासून बनवलेल्या विविध इंस्टंट रेसिपी
- कच्ची कैरी लहान तुकडे १
- लाल तिखट १ टीस्पून
- मेथी दाणे १/४ टीस्पून
- मोहरी १/२ टीस्पून
- हळद १/४ टीस्पून
- हिंग १/४ टीस्पून
- मोहरीचे तेल १ टीस्पून
- मीठ चवीनुसार
एका वाटीत सर्व साहित्य एकत्र करा आणि मसाले चांगले मिक्स करा. आता हे लोणचे फ्रिजमध्ये ठेवा आणि आवश्यकतेनुसार वापरा. या लोणच्यामध्ये तुम्ही मोहरीचा तडका सुद्धा घालू शकता.
- कैरी १
- दही: १ १/२ कप
- मीठ चवीनुसार
- लाल तिखट १/२ टीस्पून
- जिरे पावडर १/२ टीस्पून
- मोहरी: १/२ टीस्पून
- कढीपत्ता
- हिंग एक चिमूटभर
- तेल १ टीस्पून
आंबा धुवून, सोलून किसून घ्या. दही चांगले फेटून त्यात किसलेली कैरी, मीठ, तिखट आणि जिरेपूड घालून मिक्स करा. आता रायत्यात तडका द्या. यासाठी एका छोट्या
कढईत तेल गरम करा. हिंग घाला आणि एक मिनिटानंतर मोहरी घाला. मोहरी तडतडायला लागली की त्यात कढीपत्ता घाला. दहा सेकंदांनंतर तयार तडका रायत्यात घाला आणि रायता सर्व्ह करा.
- किसलेले खोबरे १ कप
- चिरलेली कैरी १/२ कप
- हिरवी मिरची २
- मीठ चवीनुसार
- पाणी फोडणीसाठी आवश्यकतेनुसार
- तेल १ टीस्पून
- मोहरी १/२ टीस्पून
- सुकी लाल मिरची १
- कढीपत्ता
- बारीक चिरलेली कैरी गार्निशिंगसाठी
ग्राइंडरमध्ये कैरीचे तुकडे, किसलेले खोबरे, हिरवी मिरची आणि थोडे पाणी घालून चांगले बारीक करा. तयार मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढून त्यात चवीनुसार मीठ घाला. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडायला लागली की तेलात कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या घालून गॅस बंद करा. तयार चटणीमध्ये हा तडका घाला. मिक्स करा आणि सर्व्ह करा.
संबंधित बातम्या