bullet train project : नवी मुंबईत बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ३९४ मीटर लांबीच्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  bullet train project : नवी मुंबईत बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ३९४ मीटर लांबीच्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण

bullet train project : नवी मुंबईत बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ३९४ मीटर लांबीच्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण

Updated May 27, 2024 11:32 PM IST

bullet train project : नवी मुंबईत बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ३९४ मीटर लांबीच्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे, अशी माहिती एनएचएसआरसीएल ने दिली आहे.

नवी मुंबईत बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बोगद्याचे खोदकाम पूर्ण
नवी मुंबईत बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बोगद्याचे खोदकाम पूर्ण

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी नवी मुंबईत ३९४ मीटर लांबीच्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे, अशी माहिती नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने सोमवारी दिली. 

घणसोली येथील मध्यवर्ती बोगद्याचे काम पूर्ण झाल्याने वांद्रे-कुर्ला संकुल ते शिळफाटा दरम्यान २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या बांधकामाला गती मिळेल, असे एनएचएसआरसीएलने सांगितले.

एनएचएसआरसीएलने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "एडीआयटीसाठी खोदकाम ६ डिसेंबर २०२३ रोजी सुरू झाले आणि ६ महिन्यांत ३९४ मीटर लांबीचे संपूर्ण उत्खनन करण्यात आले.

तज्ज्ञांच्या देखरेखीखाली २७ हजार ५१५ किलो स्फोटकांचा वापर करून एकूण २१४ नियंत्रित स्फोट करण्यात आले असून सुरक्षित उत्खननासाठी उच्च दर्जाच्या उपकरणांचा वापर करण्यात आला आहे.

२६ मीटर खोल असलेल्या एडीआयटीमुळे न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथडद्वारे अंदाजे ३.३ किमी बोगदा तयार करणे शक्य होईल आणि दोन्ही बाजूंनी सुमारे १.६ मीटर बोगद्यासाठी एकाच वेळी प्रवेश मिळेल.

बुलेट ट्रेन प्रकल्पातील २१ किमी बोगद्यापैकी १६ किमी बोगद्याचे खोदकाम टनेल बोरिंग मशिनद्वारे केले जाणार आहे, तर उर्वरित ५ किमीसाठी एनएटीएमचा वापर केला जाणार आहे.

एडीआयटी बांधकाम आणि ऑपरेशनदरम्यान मुख्य बोगद्यापर्यंत थेट वाहनांना प्रवेश देईल आणि आपत्कालीन परिस्थितीत स्थलांतरकरण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

बीकेसी येथील मुंबई बुलेट ट्रेन स्थानक ते शिळफाटा या २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम वेगाने सुरू असल्याचे एनएचएसआरसीएलने सांगितले. या बोगद्याचा सुमारे ७ किलोमीटरचा भाग ठाणे खाडीत समुद्राखाली असणार आहे.

घणसोलीजवळील बीकेसी, विक्रोळी आणि सावली येथे तीन शाफ्टचे काम सुरू असून यामुळे टीबीएमच्या माध्यमातून १६ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करणे शक्य होणार आहे.

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर प्रकल्पाची एकूण किंमत १.०८ लाख कोटी रुपये आहे आणि शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार केंद्र सरकार एनएचएसआरसीएलला १०,००० कोटी रुपये देणार आहे, तर गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना प्रत्येकी ५,००० कोटी रुपये द्यायचे आहेत.

उर्वरित रक्कम जपानकडून ०.१ टक्के व्याजदराने कर्जाच्या माध्यमातून दिली जाणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर