मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  ममता कुलकर्णी ते शायनी अहुजा; वादाच्या भोवऱ्यात अडकताच 'या' कलाकारांनी इंडस्ट्रीला ठोकला रामराम

ममता कुलकर्णी ते शायनी अहुजा; वादाच्या भोवऱ्यात अडकताच 'या' कलाकारांनी इंडस्ट्रीला ठोकला रामराम

May 27, 2024 05:39 PM IST
  • twitter
  • twitter
Controversial Celebrities: कलाकार हे त्यांच्या वक्तव्यामुळे किंवा भूमिकांमुळे कायमच चर्चेत असतात. कधीकधी यामुळे कलाकारांना त्यांचे करिअर देखील सोडावे लागते. मग या यादीमध्ये असे कोणते कलाकार आहेत चला जाणून घेऊया...
बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या लग्झरी लाईफ आणि ग्लॅमरसाठी विशेष ओळखले जातात. त्यांचे कपडे, गाड्या, घरे चाहत्यांसाठी नेहमीच आकर्षण ठरत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का कलाकार हे कधीकधी वादग्रस्त वक्तव्यांमुळे देखील अडचणीत येतात. या सगळ्याचा फटका त्यांच्या करिअरवर देखील होते. पण तुम्हाला माहिती आहे का बॉलिवूडमधील असे काही कलाकार आहेत जे वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर इंडस्ट्रीपासून लांब गेले. चला पाहूया हे कलाकार कोणते… 
share
(1 / 8)

'गँगस्टर' आणि 'वो लम्हे' या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता शायनी आहुजा सध्या कुठेही दिसत नाही. त्याच्यावर घरकाम करणाऱ्या महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणी शायनीला अटक देखील झाली होती. त्याची जामिनावर सुटका तर झाली पण शायनी त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये दिसला नाही.
share
(2 / 8)

अभिनेत्री श्रद्धा कपूरचे वडील शक्ती कपूर बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. एका वृत्तवाहिनीच्या स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये ते पकडले गेल्याने त्याच्या कारकीर्दीला मोठा धक्का बसला. त्यांनी एक पत्रकार महिलेसोबत गैरव्यवहार गेल्याची दृश्ये टीव्हीवर दाखवण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला. काही दिवसांपूर्वी ते अॅनिमल या चित्रपटात दिसले. 
share
(3 / 8)

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता म्हणून फरदीन खान ओळखला जातो. मात्र, ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. २००१ नंतर तो कधीही दिसला नाही. आता त्याचा 'हिरामंडी' या वेब सीरिजमधील भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली.
share
(4 / 8)

टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकला अभिनेता अमन वर्माचे देखील करिअर असेच बिघडले. त्याने एका अभिनेत्रीकडे सेक्स व्हिडीओची मागणी केल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्याचे इंडस्ट्रीमधील करिअर संपले.
share
(5 / 8)

१९९० च्या दशकात ममता कुलकर्णी ही बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती. पण ड्रग्ज प्रकरणी तिचे नाव येताच करिअर उद्धवस्त झाले. या प्रकरणी तिच्या पतीला देखील अटक करण्यात आली होती.
share
(6 / 8)

अभिनेता आदित्य पांचोली आणि अभिनेत्री जरीना वहाब यांचा मुलगा सूरज पांचोलीचे करिअर संपले आहे. निशब्दम आणि गजनी सारख्या चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला.
share
(7 / 8)

नव्वदच्या दशकात अभिनेत्री मोनिका बेदी अतिशय लोकप्रिय होती. तिचे आणि अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम यांचे संबंध असल्याची माहिती समोर आली होती. बनावट कागदपत्रांद्वारे देशात प्रवेश केल्याप्रकरणी तिला २००२ मध्ये पोर्तुगालमध्ये अटक करण्यात आली होती.
share
(8 / 8)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज