पाटणा लॉ कॉलेजच्या आवारात बी. एन. कॉलेजच्या पदवीच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या एका २२ वर्षीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चेहरा झाकून आलेल्या एका टोळक्याने विद्यार्थ्याला बेदम मारहाण करून त्याची हत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी घडली.
हर्ष राज असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो वैशाली जिल्ह्यातील रहिवासी असून अंतिम वर्षाची परीक्षा देण्यासाठी पाटणा लॉ कॉलेजमध्ये आला होता. मात्र परीक्षा हॉलमधून बाहेर येताच त्याला मारहाण करण्यात आली. त्यांला तातडीने पाटणा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (पीएमसीएच) दाखल करण्यात आले, मात्र तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर पाटणा शहराचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक दशरथ आर. एस. यांच्या नेतृत्वात पोलिस पथकाने घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी सांगितले की, ७ ते ८ गुन्हेगारांनी हर्ष राज याला कॉलेजच्या परिसरातच बेदम मारहाण केली. गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी कॉलेज परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून इतर पुरावे गोळा केले जात आहेत. हल्लेखोरांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून लवकरच त्यांना अटक केली जाईल.
मृत हर्ष राज यांचे वडील तसेच एका हिंदी दैनिकात काम करणारे पत्रकार अजित कुमार यांनी सांगितले की, हर्ष यांनी विद्यापीठातील आगामी विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीची तयारी सुरू केल्यापासून तो प्रचंड तनावात होता. तो विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवत होता.
पाटणा विद्यापीठाच्या २८ मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या असून मंगळवारी सर्व महाविद्यालये बंद राहतील, असे विद्यापीठाने सायंकाळी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
उत्तरप्रदेश राज्यातील आग्रा येथे एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथे एका तरुणीने प्रियकराशी झालेल्या वादातून ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रियकर समोर पाहातच राहिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तेजीने व्हायरल होत आहे.