Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
जगातील तीन निष्पाप आणि भोळे चेहरे कोणते?
पहिला - झोपलेल्या लहान मुलाचा चेहरा
दुसरा - उसने पैसे मागणाऱ्या माणसाचा चेहरा
हसू नका…
तिसरा - तुमच्या आई-वडिलांसमोर बसलेल्या तुमच्या मित्राचा चेहरा.
…
उन्हाळ्याच्या सुट्टीत माझा प्लान ठरलेला असतो…
मागच्या वर्षी अमेरिकेला गेलो नव्हतो.
या वर्षी ऑस्ट्रेलियाला जाणार नाही!
…
नातेवाईक - बंड्या, खूप मोठा झालास. आधी पाहिलं होतं तेव्हा केवढासा होतास
बंड्या - हो काका, दुसरा काही इलाज नव्हता.
मोठं व्हायला पैसेही लागत नव्हते.
वाटलं, होऊन जाऊ एकदाचं…
(नातेवाईक तोंडात मारल्यासारखे निघून गेले)
…
पण राक्षसाची जात सगळ्यात हसमुख होती…
एक वाक्य बोललं की हसत सुटायची!
…
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या