CTM Routine in Skin Care: त्वचेची नीट काळजी घेण्यासाठी आपण दररोज काही स्टेप्स फॉलो केल्या पाहिजे. योग्य स्टेप्स फॉलो करून त्वचेची काळजी घेतली तर आठवडाभरात चेहरा उजळू शकतो. तसं तर त्वचेची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. परंतु सर्वात बेसिक पद्धत म्हणजे सीटीएम (CTM) म्हणजे क्लीनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग. त्वचेची काळजी घेण्याचा हा सर्वात बेसिक मार्ग आहे. जर तुम्ही त्याचे पालन केले तर तुम्हाला उत्तम परिणाम मिळेल. जाणून घ्या, काय आहे सीटीएम रुटीन आणि त्याचा कसा फायदा होतो.
त्वचेवर साचलेली घाण, तेल आणि मेकअप काढून टाकण्यासाठी योग्य क्लिन्झरने चेहरा धुवा. तुम्हाला बाजारात अनेक प्रकारचे क्लींजर मिळतील. त्यामुळे तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार चांगला क्लिंजर निवडा. तुम्ही योग्य उत्पादन निवडल्यास तुमची त्वचा चमकदार होईल आणि अबाधित राहील. नेहमी क्लिंजरला सर्कुलर मोशनमध्ये मसाज करून लावा आणि नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा. जर तुम्हाला घरगुती वस्तूंनी तुमचा चेहरा स्वच्छ करायचा असेल, तर दूध किंवा त्याची साय सर्वोत्तम क्लिंजर ठरू शकते.
क्लींजिंगनंतर टोनिंग फॉलो करा. टोनर तुमच्या त्वचेचा पीएच संतुलित करतो, छिद्र घट्ट करण्यास आणि घाण साफ करण्यास मदत करतो. चेहरा स्वच्छ केल्यानंतर, कापसावर थोडे टोनर घ्या आणि नंतर आपल्या चेहऱ्यावर आणि मानेला लावा. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार टोनर देखील निवडा. तुम्ही घरी बनवलेले राइस वॉटर टोनर देखील वापरू शकता.
सीटीएम रुटीनच्या शेवटची स्टेप म्हणजे मॉइश्चरायझिंग, जे तुमची त्वचा हायड्रेट ठेवते आणि कोरडेपणा दूर करते. तुमची त्वचा ऑइली असली तरीही ही स्टेप अजिबात चुकवू नका. तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर थोड्या प्रमाणात मॉइश्चरायझर लावा. घरगुती वस्तू लावून त्वचा हायड्रेट करायची असेल तर तुम्ही एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या