मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Gautam Gambhir : आयपीएल फायनल जिंकल्यानंतर गौतम गंभीरला मिळाला सचिनसारखा सन्मान, खेळाडूंनी काय केलं? पाहा

Gautam Gambhir : आयपीएल फायनल जिंकल्यानंतर गौतम गंभीरला मिळाला सचिनसारखा सन्मान, खेळाडूंनी काय केलं? पाहा

May 27, 2024 11:00 AM IST

KKR VS SRH, IPL 2024 Final : कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नईमध्ये सनरायझर्स हैदराबादचा ८ विकेट्सनी पराभव केला. या विजयासह संघाने आयपीएल २०२४ चे विजेतेपद पटकावले. केकेआरच्या विजेतेपदानंतर खेळाडूंनी जल्लोष साजरा केला.

Gautam Gambhir : आयपीएल फायनल जिंकल्यानंतर गौतम गंभीरला मिळाला सचिनसारखा सन्मान, खेळाडूंनी काय केलं? पाहा
Gautam Gambhir : आयपीएल फायनल जिंकल्यानंतर गौतम गंभीरला मिळाला सचिनसारखा सन्मान, खेळाडूंनी काय केलं? पाहा

आयपीएल २०२४ ची फायनल रविवारी (२६ मे) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळली गेली. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने रेड हॉट फॉर्ममध्ये असलेल्या सनरायझर्स हैदराबादचा एकतर्फी पराभव केला.

ट्रेंडिंग न्यूज

या संपूर्ण मोसमात केकेआरने जबरदस्त खेळ दाखवला. त्यांच्यासमोर जो संघ आला त्याला ते चिरडत पुढे गेले. केकेआरच्या या उत्तुंग यशामागे त्यांचा मेंटॉर गुरू आणि माजी कर्णधार गौतम गंभीरचा मोठा वाटा आहे.

IPL २०२४ पूर्वी KKR ने गौतम गंभीरला मेंटर म्हणून नियुक्त केले होते. गंभीरचे केकेआरशी खास नाते आहे. २०१२ आणि २०१४ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली त्याने या फ्रँचायझीला आयपीएल जिंकून दिले होते. आता त्याने केकेआरला तिसरी ट्रॉफी मेंटॉरच्या रूपात मिळवून दिली आहे.

अशा स्थितीत आयपीएल २०२४ जिंकल्यानंतर केकेआरच्या खेळाडूंनी गौतम गंभीरला विशेष सन्मान दिला.

कोलकाता नाईट रायडर्सने विजेतेपद पटकावल्यानंतर चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर एक खास क्षण पाहायला मिळाला. केकेआरच्या खेळाडूंनी संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरला खांद्यावर घेऊन जल्लोष केला. हे दृश्य पाहून चाहत्यांना सचिन तेंडुलकरची आठवण झाली. वास्तविक, जेव्हा भारताने २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी अशाच पद्धतीने खेळाडूंनी सचिनला खांद्यावर घेऊन मैदानात फेरी मारली होती. तसाच सन्मान रविवारी गौतम गंभीरला मिळाला.

कोलकाता नाईट रायडर्सने १० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर तिसरे आयपीएल विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत नाणेफेक जिंकल्यानंतर हैदराबादने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो फारसा प्रभावी ठरला नाही. हैदराबादचा डाव ११३ धावांत आटोपला. KKR ने हे लक्ष्य ८ विकेट्स आणि ५७ चेंडू बाकी असताना पार केले.

केकेआरकडून सुनील नरेनने या मोसमात दमदार कामगिरी केली. त्याने १५ सामन्यात ४८८ धावा केल्या आणि १९ विकेट घेतल्या. त्याने १ शतक आणि ३ अर्धशतके झळकावली. नरेनसह फिलिप सॉल्टनेही चांगली कामगिरी केली. त्याने १२ सामन्यात ४३५ धावा केल्या. सॉल्टने ४ अर्धशतके झळकावली.

विशेष म्हणजे केकेआर तिसऱ्यांदा आयपीएलचा चॅम्पियन बनला आहे. या संघाने २०१२ मध्ये पहिल्यांदा विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर २०१४ मध्ये तो जिंकला. आता संघ १० वर्षानंतर २०२४ मध्ये चॅम्पियन बनला आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४