मराठी बातम्या  /  धर्म  /  Veer Savarkar Jayanti 2024 : वीर सावरकर यांच्याबाबत या गोष्टी माहीत आहेत का? जाणून घ्या

Veer Savarkar Jayanti 2024 : वीर सावरकर यांच्याबाबत या गोष्टी माहीत आहेत का? जाणून घ्या

May 28, 2024 09:59 AM IST

veer savarkar jayanti 2024 : आज मंगळवारी (२८ मे) वीर सावरकर यांची जयंती आहे. या निमित्ताने आपण त्यांच्या जीवनाविषयी जाणून घेणार आहोत.

Veer Savarkar Jayanti 2024 : वीर सावरकर यांच्याबाबत या गोष्टी माहीत आहेत? जाणून घ्या
Veer Savarkar Jayanti 2024 : वीर सावरकर यांच्याबाबत या गोष्टी माहीत आहेत? जाणून घ्या

वीर सावरकर अर्थात विनायक दामोदर सावरकर  हे थोर स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, वकील, लेखक, समाजसुधारक आणि हिंदुत्व तत्वज्ञानाचे संस्थापक होते. सावरकरांचा जन्म २८ मे १८८३ रोजी नाशिकजवळील भागपूर गावात झाला. 

ट्रेंडिंग न्यूज

सावकरांना गणेश, नारायण आणि बहीण मैना ही तीन भावंडे होती. वीर सावरकरांना वयाच्या १२व्या वर्षी "वीर" हे टोपणनाव मिळाले, जेव्हा त्यांनी त्यांच्या गावावर हल्ला करणाऱ्या एका गटाच्या विरोधात विद्यार्थ्यांचे नेतृत्व केले.

आज वीर सावरकरांची जयंती आहे. या निमित्ताने आपण त्यांच्या जीवनाविषयी जाणून घेणार आहोत. सावकरांचा जन्म १८८३ साली तर त्यांचा मृत्यू २६ फेब्रुवारी १९६६ साली झाला.

वीर सावरकरांबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?

१)  १९०१ मध्ये विनायक दामोदर सावरकर यांचा विवाह रामचंद्र त्र्यंबक चिपळूणकर यांच्या कन्या यमुनाबाईशी झाला. त्यांनीच त्यांच्या विद्यापीठीय शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. १९०२ मध्ये त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

Vaisakha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमा अन् वैशाख पौर्णिमेच्या या शुभ दिवशी काय करावे आणि काय करू नये? वाचा

३) अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर येथील विमानतळाचे २००२ मध्ये वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यात आले. त्यांना ५० वर्षांची शिक्षा झाली आणि १९११ मध्ये अंदमान आणि निकोबार बेटांमधील सेल्युलर जेलमध्ये पाठवण्यात आले. १९२१ मध्ये त्यांची सुटका झाली.

४) ७ जानेवारी १९२५ रोजी त्यांची मुलगी प्रभात आणि १७ मार्च १९२८ रोजी त्यांचा मुलगा विश्वास यांचा जन्म झाला.

५) १९२३ मध्ये त्यांनी "हिंदुत्व" या शब्दाची स्थापना केली आणि सांगितले की भारत फक्त त्या लोकांचा आहे, ज्यांच्यासाठी ती त्यांची पवित्र भूमी आणि पितृभूमी आहे.

६) वीर सावरकरांनी त्यांच्या हिंदुत्व या पुस्तकात हिंदू आणि मुस्लिम हे दोन वेगळे राष्ट्र असे वर्णन करून द्विराष्ट्र सिद्धांताची स्थापना केली. हिंदू महासभेने १९३७ मध्ये तो ठराव मंजूर केला.

WhatsApp channel