'टी-20 विश्वचषक २०२४ हा २ जूनपासून वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये सुरू होत आहे. २५ मे रोजी भारतीय खेळाडूंची पहिली तुकडी अमेरिकेला रवाना झाली. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांच्यासह १२ खेळाडूंचा समावेश होता. शुभमन गिल आणि खलील अहमद हे राखीव खेळाडूही अमेरिकेत पोहोचले आहेत.
पण हार्दिक पांड्या या गटात कुठेही दिसला नाही, तर त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स हा IPL २०२४ मधून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. अशातच त्याच्या पत्नी नताशा स्टॅनकोविचसोबत घटस्फोटाच्या बातम्याही समोर येत आहे. अशा परिस्थिती हार्दिक पंड्याचे USA ला न पोहोचणे चाहत्यांसाठी निश्चितच चिंतेचा विषय आहे.
रविवारी (२६ मे) क्रिकबझने एक बातमी प्रसिद्ध केली होती, की घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान हार्दिक पंड्या सध्या एका अज्ञात परदेशी ठिकाणी सुट्टी घालवत आहे. IPL २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीनंतर हार्दिकने भारत सोडला होता. हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर राहिलीा आणि प्लेऑफमधून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला होता.
तसेच, या बातमीत, असाही दावा करण्यात आला आहे की, २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत उपकर्णधार असणारा हार्दिक थेट न्यूयॉर्कमधील भारतीय संघाच्या शिबिरात सामील होईल.
पण हार्दिक न्यूयॉर्कला कधी पोहोचेल, याची माहिती समोर आलेली नाही, मात्र घटस्फोटाच्या बातमीचा त्याच्या विश्वचषकातील कामगिरीवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी अपेक्षा आहे.
हार्दिक पंड्याशिवाय संजू सॅमसन, युझवेंद्र चहल, आवेश खान, रिंकू सिंग हे आयपीएल २०२४ च्या प्लेऑफमध्ये व्यस्त होते. हे खेळाडू अद्याप अमेरिकेला गेलेले नाहीत. त्याचवेळी विराट कोहलीने आरसीबीच्या प्लेऑफमधून बाहेर पडल्यानंतर बीसीसीआयकडे ब्रेकची मागणी केली होती, त्यामुळे तोही अद्याप भारतीय संघाच्या शिबिरात सहभागी होऊ शकलेला नाही.
भारतीय संघाला T20 विश्वचषक 2024 च्या अ गटात ठेवण्यात आले आहे. पाकिस्तान, आयर्लंड, अमेरिका आणि कॅनडा या गटात आहेत. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे, तर 9 जून रोजी संघाचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होणार आहे. भारताचा सामना १२ जूनला अमेरिकेशी तर १५ जूनला कॅनडाशी होणार आहे.
टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल. अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
राखीव खेळाडू - शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान
संबंधित बातम्या