भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीत अंबानीची मुलगा अनंत यांच्या प्री-वेडिंग पार्टीची सध्या जोरदार चर्चा रंगील आहे. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानीची प्री-वेडिंग पार्टी ही इटली आणि फ्रान्स दरम्यान क्रूजवर आयोजित करण्यात आली आहे. हे दोघे जुलै महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत.
(File Photo)सोशल मीडियावर नुकत्याच व्हायरल झालेल्या निमंत्रण पत्रिकेनुसार, दक्षिण फ्रान्सच्या किनाऱ्यावरील क्रूझवरुन २९ मे ते १ जून या कालावधीत हा सोहळा पार पडणार आहे.
(File Photo)एमएस धोनी, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि सलमान खान सारख्या स्टार्ससह सुमारे ८०० पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या भव्य सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी इटलीला रवाना झाले आहेत.
(File Photo)अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग पार्टीच्या निमंत्रण पुत्रिकेवर 'ला विटे ए अन व्हायजिओ' असे लिहिले आहे. याचा इंग्रजीत अर्थ 'लाइफ इज अ जर्नी' असा होतो.
(Reuters)राधिका मर्चंट या प्री-वेडिंग पार्टीला गॅलेक्टिक प्रिन्सेसच्या संकल्पनेतून प्रेरित ग्रेस लिंग कॉटरचा एक कस्टममेड ड्रेस परिधान करणार आहे. एरोस्पेस अॅल्युमिनियम तंत्रज्ञानाचा वापर करून हा ड्रेस तयार करण्यात आला आहे. हा आउटफिट एक आश्चर्यकारक निर्मिती आहे.
(Instagram)रिपोर्टनुसार, या प्री-वेडिंग पार्टीमध्ये पारसी, थाई, मेक्सिकन आणि जपानी पदार्थ असणार आहेत. त्यामध्ये गोड पदार्थांचा देखील समावेश आहे.
(Unsplash)