मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भूषण देसाईंचा शिवसेनेशी काही संबंध नाही, ज्यांना वॉशिंग मशीनमध्ये..” आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

भूषण देसाईंचा शिवसेनेशी काही संबंध नाही, ज्यांना वॉशिंग मशीनमध्ये..” आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 13, 2023 08:29 PM IST

Aditya Thackeray reaction on Bhushan desai : भूषण देसाई यांचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नाही. ते कधीही शिवसेनेत सक्रीय नव्हते. ज्यांना कुणाला वॉशिंग मशीनमध्ये जायचं आहे त्यांनी जरूर जावं, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

Aditya Thackeray reaction on Bhushan desai
Aditya Thackeray reaction on Bhushan desai

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावान नेते म्हणून ओळख असलेल्या माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यावर शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भूषण देसाई व शिवसेनेशी काहीही संबंध नाही, सुभाष देसाई आमच्यासोबत आहेत, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

बाळासाहेब ठाकरे हेच माझे दैवत आहेत. मात्र महाराष्ट्राचा विकास आणि बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्याचे काम एकनाथ शिंदे करत आहेत. शिंदे यांचे काम मी जवळून पाहिले आहे. त्यांच्या कामाची पद्धतही मला माहीत आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे भूषण देसाई यांनी म्हटले.

यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, भूषण देसाई यांचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नाही. ते कधीही शिवसेनेत सक्रीय नव्हते. ज्यांना कुणाला वॉशिंग मशीनमध्ये जायचं आहे त्यांनी जरूर जावं. सुभाष देसाई हे आमच्यासोबत आहेत. ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत सावली सारखे असतात. ते आम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीत. भूषण देसाई यांचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नाही त्यांना जिथे कुठे जायचं आहे त्यांनी जावं.

आदित्य ठाकरेंच्या विधानावर भूषण देसाई यांनीही पलटवार केला आहे. आदित्य ठाकरेंनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं त्यावर मी काय बोलणार? मी खूप लहान आहे. तुम्ही जर माहिती घेतली तर तुम्हाला समजेल की माझा शिवसेनेशी संबंध आहे की नाही? असंही भूषण देसाईं यानी म्हटलं आहे. तसंच माझ्या वडिलांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे मात्र मी काय करायचं ते मी ठरवलं होतं.

IPL_Entry_Point