Thane Murder News: ठाण्यात विवाहित बहिणीशी प्रेमसंबंध असल्याचा संशयातून तरुणाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याला भिवंडी न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत. ही घटना २८ मे २०२४ रोजी नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिवंडीत घडली.
आनंद गुप्ता असे मृताचे नाव आहे. तो मुंबईतील एका कंपनीत सेल्स विभागात कामाला होता आणि तो भिवंडीत आपल्या कुटुंबासह राहत होता. तर, सुजित गायकवाड (वय, २५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे आहे. दरम्यान, २८ मे २०२४ रोजी गायकवाडने गुप्ता यांना भिवंडीतील लोढाधाम येथे चर्चेसाठी बोलावले आणि नंतर त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर गायकवाडने रागाच्या भरात गुप्तावर याची हत्या केली. त्यानंतर दोन साथीदारासह त्याचा मृतदेह कारमध्ये पुण्याला नेला आणि खदानीत फेकून दिलामृतदेह खदानीत फेकून दिला.
एका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “ मयत गुप्ता आरोपीच्या बहिणीच्या संपर्कात होता आणि ते प्रेमात पडले. आरोपीच्या बहिणीचे लग्न झाले होते आणि ती तिच्या पतीसोबत माणकोली येथील लोढा धाम येथे राहत होती. आरोपीने गुप्ताला बहिणीपासून दूर राहण्यास अनेकदा सांगितले. मात्र, त्यानंतर त्यानंतरही गुप्ता आरोपीच्या बहिणीच्या संपर्कात होता. घटनेच्या दिवशी गुप्ता यांनी माणकोली येथे कोणालातरी भेटण्यासाठी जात असल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. तसेच इतर नातेवाईकांकडे विचारपूस केली.
गुप्ताचा कुठेही तपास न लागल्याने त्याच्या कुटुंबाने माणकोली पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांना गायकवाड याच्यावर संशय आल्याने त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी आरोपीने हत्येची कबूली दिली. याप्रकरणातील दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
संबंधित बातम्या