Mumbai water Cut : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 'या' भागात गुरुवार, शुक्रवारी पाणी पुरवठा राहणार बंद
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai water Cut : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 'या' भागात गुरुवार, शुक्रवारी पाणी पुरवठा राहणार बंद

Mumbai water Cut : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 'या' भागात गुरुवार, शुक्रवारी पाणी पुरवठा राहणार बंद

Published Jun 02, 2024 08:38 AM IST

Mumbai water Cut : मुंबई महानगर पालिकेने पाईपलाइन दुरुस्तीची कामे हाती घेतली आहे. या कामामुळे गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबईच्या काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

मुंबई महानगर पालिकेने पाईपलाइन दुरुस्तीची कामे हाती घेतली आहे. या कामामुळे गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबईच्या काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
मुंबई महानगर पालिकेने पाईपलाइन दुरुस्तीची कामे हाती घेतली आहे. या कामामुळे गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबईच्या काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

Mumbai water Cut : मुंबईत सध्या ५ टक्के आणि १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही पाणी कपात सुरू असतांना आता पाइपलाइन आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईत काही भागात गुरुवारी आणि शुक्रवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी यांची दखल घ्यावी, व पाणी साठा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई महानगर पालिकेने दीलेल्या माहितीनुसार करी रोड, डिलाईल रोड, लोअर परळमध्ये ६, ७ जून रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Pune Porsche Car Accident : 'मी मद्यधुंद अवस्थेत होतो; मला काही आठवत नाही'; पोलिस तपासात आरोपी मुलाचा व आईचा असहकार

मुंबई महानगरपालिकेने शहर विभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी व जुन्या व जीर्ण जलवाहिण्या बदलण्यासाठी विविध देखभाल दुसरुस्तीची कामे हाती घेतली आहे. या कामा अंतर्गत ‘जी दक्षिण’ विभागातील रेसकोर्स येथे प्रत्येकी १ हजार ४५० व्यासाच्या तानसा (पूर्व) व तानसा (पश्चिम) या प्रमुख जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम केली जाणार आहे. या कामामुळे जी दक्षिण विभागातील पाणीपुरवठा ६ जूनला रात्री ९.४५ वाजल्यापासून ७ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

Maharashtra Weather Update: विदर्भ तापलेलाच! नागपूर, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यात हीट वेव्ह! ‘या’ ठिकाणी पावसाचा अंदाज

या कामासाठी तब्बल १७ तास १५ मिनिटांचा कालावधी लागणार असल्याने या दरम्यान करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, डिलाईल रोज, बीडीडी चाळ, लोअर परळ येथील पाणी पुरवठा हा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी कपात लागू असणाऱ्या भागात नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील धारणांनी गाठला तळ

राज्यात असलेल्या बहुतांश धरणांनी तळ गाठला आहे. यामुळे जलसंकट गहिरे झाले आहे. मराठवाडा, विदर्भात अनेक जिल्ह्यात पाणी टंचाईने भीषण रूप धारण केले आहे. अनेक ठिकाणी टँकरच्या साह्याने पाणी पुरवठा केला जात आहे. संभाजीनगर येथे तर पाणी टंचाईने गंभीर रूप धारण केले आहे. राज्यात अद्याप मॉन्सूनच्या पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवस पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर