UEFA Champions League Final : रिअल माद्रिदने विक्रमी १५व्यांदा UEFA चॅम्पियन्स लीग जिंकली, फायनलमध्ये डॉर्टमंडचा धुव्वा
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  UEFA Champions League Final : रिअल माद्रिदने विक्रमी १५व्यांदा UEFA चॅम्पियन्स लीग जिंकली, फायनलमध्ये डॉर्टमंडचा धुव्वा

UEFA Champions League Final : रिअल माद्रिदने विक्रमी १५व्यांदा UEFA चॅम्पियन्स लीग जिंकली, फायनलमध्ये डॉर्टमंडचा धुव्वा

Published Jun 02, 2024 02:41 PM IST

Real Madrid Won Uefa Champions League 2024 : रिअल माद्रिदने चॅम्पियन्स लीग जिंकली आहे. त्यांनी फायनलमध्ये जर्मन क्लब डॉर्टमंडचा २-० असा पराभव केला.

UEFA Champions League Final : रिअल माद्रिदने विक्रमी १५व्यांदा UEFA चॅम्पियन्स लीग जिंकली, फायनलमध्ये डॉर्टमंडचा धुव्वा
UEFA Champions League Final : रिअल माद्रिदने विक्रमी १५व्यांदा UEFA चॅम्पियन्स लीग जिंकली, फायनलमध्ये डॉर्टमंडचा धुव्वा (AFP)

Uefa Champions League Final 2024 : जगातील सर्वात मोठी फुटबॉल लीग चॅम्पियन्स लीगच्या ३२ व्या हंगामाचा विजेता मिळाला आहे. रिअल माद्रिदने विक्रमी १५व्यांदा चॅम्पियन्स लीगची फायनल जिंकली आहे. विजेतेपदाच्या लढतीत स्पॅनिश क्लब रिअल माद्रिदने जर्मन क्लब डॉर्टमंडचा २-० असा पराभव केला.

शनिवारी (१ जून) रात्री उशिरा लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर रिअल माद्रिदसाठी व्हिनिसियस ज्युनियरने ८४व्या मिनिटाला आणि डॅनी कार्वाजलने ७३व्या मिनिटाला गोल केला. प्रत्येक हंगामात ३२ संघ UEFA चॅम्पियन्स लीगमध्ये सहभागी होतात, ज्यांची ८ गटांमध्ये विभागणी केली जाते.

डॉर्टमंड संघ तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगची फायनल खेळत होता. यापूर्वी १९९६-९७ हंगामात ते चॅम्पियन बनले होते. तर २०१२-१३ आणि या हंगामात संघ अंतिम फेरीत पोहोचला होता, पण त्यांना जेतेपद पटकावता आले नाही.

पहिल्या हाफमध्ये डॉर्टमंडचा दमदार खेळ

पहिल्या हाफमध्ये डॉर्टमंडचा वरचष्मा होता. डॉर्टमंडने सातत्याने गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या, पण याचे त्यांना गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. फायनल सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये रिअल माद्रिदने खूपच लाजिरवाणी कामगिरी केली. पूर्वार्धात त्यांना केवळ दोनच शॉट्स टार्गेटर्यंत पोहोचले.

रिअल माद्रिदचा शानदार पलटवार

पहिल्या हाफनंतर रिअल माद्रिदने आक्रमक पध्दतीचा अवलंब करत सातत्याने आक्रमणा करत गोलच्या संधी निर्माण केल्या. पहिला गोल ५७व्या मिनिटाला रिअल माद्रिदचा बचावपटू डॅनी कार्वाजल याने केलेल्या हेडरवरून झाला. त्यानंतर ९ मिनिटांनी विनिशियस ज्युनियरने गोल केला. अशा प्रकारे संघाने २०ृ-० अशी आघाडी घेतली.

९० मिनिटांनंतर ४० मिनिटांचा इंज्युरी टाईम देण्यात आला, मात्र डॉर्टमंडच्या खेळाडूंना या संधीचा फायदा घेता आला नाही. अशाप्रकारे रिअल माद्रिदने २-० असा विजय मिळवला आणि विक्रमी १५व्यांदा UEFA चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकावले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या