मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Byculla Fire: मुंबईत भायखळा येथील ५७ मजली इमारतीला भीषण आग; बचावकार्य सुरू

Mumbai Byculla Fire: मुंबईत भायखळा येथील ५७ मजली इमारतीला भीषण आग; बचावकार्य सुरू

Jun 02, 2024 05:33 PM IST

Mumbai Byculla Fire News: भायखळा पश्चिम येथील खटाव मिल कंपाऊंडमधील मोंटे साऊथ इमारतीच्या ए विंगच्या दहाव्या मजल्यावरील फ्लॅटला रात्री पावणे अकराच्या सुमारास आग लागली.

मुंबईच्या भायखळा येथील ५७ मजली इमारतीला भीषण आग लागली.
मुंबईच्या भायखळा येथील ५७ मजली इमारतीला भीषण आग लागली.

Mumbai Fire News Today: दक्षिण मुंबईतील भायखळा परिसरातील एका उंच इमारतीला मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेने परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

भायखळा पश्चिम येथील खटाव मिल कंपाऊंडमधील मॉन्टे साऊथ इमारतीच्या ए विंगच्या दहाव्या मजल्यावरील फ्लॅटला रात्री पावणेअकराच्या सुमारास आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आगीमुळे नेमके किती लोक अडकले आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही, असे या अधिकाऱ्याने सांगितले. वृत्त मिळेपर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले तरी अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही आग दहाव्या मजल्यावरील फ्लॅटपुरती मर्यादित असली तरी संपूर्ण मजल्यावर धुराचे लोट पसरले होते. इमारतीच्या वरच्या मजल्यावर काही लोक अडकले आहेत. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि अग्निशमन दलाच्या इतर गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलिस, १०८ रुग्णवाहिका, बेस्टची वीज शाखा आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे स्थानिक वॉर्ड कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

धारावी झोपडपट्टीतील एका औद्योगिक वसाहतीला आग
शहरातील धारावी झोपडपट्टीतील एका औद्योगिक वसाहतीला लागलेल्या आगीत सहा जण जखमी झाल्याची घटना सहा दिवसांपूर्वी घडली होती. काळा किल्ला येथील अशोक मिल कंपाऊंडमधील तीन मजली आणि चार मजली इमारतींमध्ये पहाटे पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग एका कापड कारखान्यापासून लागली. त्यानंतर आग सर्वत्र पसरली.

जुहूमध्ये महानगर गॅस लिमिटेड पाईपलाईनला जेसीबी धडकल्याने आग
४ मे रोजी जुहू भागात महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) पाईपलाईनला जेसीबी धडकल्यामुळे लागलेल्या आगीत रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामात गुंतलेले पाच मजूर जखमी झाले होते. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यापूर्वीच पाच दुकाने जळून खाक झाली.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग