हिंदू धर्मात अनेक महत्वाच्या मान्यता आहेत. त्यातीलच एक म्हणजे जोतिषशास्त्र होय. जोतिषशास्त्रात ग्रह-नक्षत्रांच्या आधारे व्यक्तींचे भविष्य, स्वभावगुण आणि दोषही सांगितले जातात. ग्रह-नक्षत्रांच्या स्थान बदलांचा परिणाम राशीचक्रातील १२ राशींवर होत असतो. आज २ जून रोजी गुरुचा वृषभ राशीत उदय होत आहे. जोतिषशास्त्राच्यादृष्टीने ही एक अत्यंत महत्वाची बाब आहे. पुढील एक वर्षापर्यंत गुरु उदय वृषभ राशीमध्येच राहणार आहे. अशातच गुरु उदयाचा सकारात्मक प्रभाव राशीचक्रातील काही राशींवर पडणार आहे. पाहूया या नशीबवान राशी कोणत्या आहेत.
मेष राशीच्या लोकांसाठी हा गुरु उदय अत्यंत लाभदायक असणार आहे. या राशीच्या लोकांसाठी आर्थिक, वैवाहिक आणि करिअरच्या बाजूनेसुद्धा फायदाच-फायदा मिळणार आहे. या एक वर्षाच्या कालावधीत मेष राशीच्या लोकांसाठी परदेशी जाण्याचा योग येऊ शकतो. शिवाय करिअरमध्ये वेगाने प्रगती होईल. धनलाभ होऊन आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होईल. जोडीदारासोबत मोकळेपणाने संवाद साधला गेल्याने एकमेकांबद्दल अनेक चांगल्या गोष्टी नव्याने समजतील. त्यामुळे प्रेम आणि आदर वाढीस लागेल. व्यापर-उद्योगात मोठे प्रकल्प हाती लागून आर्थिक लाभ होईल.
कर्क राशीच्या लोकांसाठी गुरु उदयचा प्रभाव अत्यंत शुभ आणि फायदेशीर असणार आहे. याकाळात तुम्हाला विविध क्षेत्रातील गुंतवणुकीतून प्रचंड नफा होणार आहे. त्यामुळे आर्थिक प्रगतीसुद्धा वेगाने होईल. कार्यक्षेत्रात तुमच्या कलागुणांना वाव मिळून, तुमचे करिअर यशाच्या शिखरावर पोहोचेल. वरिष्ठांकडून कौतुक आणि मानसन्मान प्राप्त होईल. यातूनच नोकरीत बढतीसुद्धा होण्याचा योग जुळून येत आहे. व्यवसायात प्रतिस्पर्धी डोके वर काढतील. मात्र बुद्धी चातुर्याने त्यांच्यावर मात करण्यात यशस्वी व्हाल. याकाळात जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी लाभणार आहे. त्यामुळे उत्तम गृहसौख्य लाभेल.
गुरु उदयचा परिणाम कन्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत फलदायी असणार आहे. याकाळात विविध योजना राबवाल त्यामध्ये यशसुद्धा मिळेल. तसेच हातात घेतलेली महत्वाची कामे विनाअडथळा पूर्ण होतील. त्यामुळे मानसिक समाधान लाभेल. कामाच्या ठिकाणी एखाद्या गोष्टीत वरिष्ठांचे संपूर्ण सहकार्य लाभेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये तुमच्याप्रती प्रेम आणि आदर वाढेल. त्यामुळे घरातील वातावरण आनंदायक असणार आहे. वर्षभरात तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा अधिक उत्तम असणार आहे. त्यामुळे कोणतेही कार्य करताना उत्साह जाणवेल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गुरु उदय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. गुरु उदयामुळे तुमच्या अत्तापर्यंतच्या कष्टांचे फळ प्राप्त होईल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. नावलौकिक वाढून मानसन्मान मिळेल. याकाळात व्यवसायिक एखादा नवीन व्यवसाय सुरु करू शकतात. त्यातून मोठा आर्थिक लाभसुद्धा होईल. तसेच तुम्ही आपल्या जवळच्या लोकांशी नातेसंबंध सुधारण्याचा विशेष प्रयत्न कराल. कामाच्या व्यापातूनसुद्धा जोडीदाराला पुरेसा वेळ द्याल. त्यामुळे जोडीदारासोबतसुद्धा नाते अधिक दृढ होईल.
कुंभ राशीच्या लोकांवर गुरु उदयचा समाधानकारक परिणाम दिसून येणार आहे. याकाळात तुम्हाला चांगल्या सकारत्मक घटना घडलेल्या पाहायला मिळतील. कार्यक्षेत्रात निश्चितच मनासारखी प्रगती होणार आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि उत्साहसुद्धा वाढलेला असेल. व्यापाऱ्यांना या काळात विशेष लाभ मिळणार आहे. व्यवसायचा विस्तार होऊन आर्थिक स्थिती दुपट्टीने सुधारेल. मात्र आईच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. अथवा जुनी दुखणी पाठ धरु शकतात.
संबंधित बातम्या