मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sana Khan: भर पार्टीत प्रेग्नंट सनाला पतीने खेचलं? अखेर अभिनेत्रीने स्वतः दिलं स्पष्टीकरण! म्हणाली...

Sana Khan: भर पार्टीत प्रेग्नंट सनाला पतीने खेचलं? अखेर अभिनेत्रीने स्वतः दिलं स्पष्टीकरण! म्हणाली...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 17, 2023 06:56 PM IST

Sana Khan explanation on viral video: बाबा सिद्दिकीच्या इफ्तार पार्टीत मुफ्ती अनस पत्नी सनाचा हात खेचत तिला पार्टीतून बाहेर नेताना दिसला होता. आता या व्हायरल व्हिडीओवर अभिनेत्रीने स्पष्टीकरण दिले आहे.

Sana Khan explanation on viral video
Sana Khan explanation on viral video

Sana Khan explanation on viral video: रविवारी मुंबईत बाबा सिद्दीकी आणि झीशान सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत टेलिव्हिजन आणि चित्रपट जगतातील अनेक कलाकार हजार होते. बॉलिवूड अभिनेता सलमान खानपासून शहनाज गिल आणि रश्मी देसाईपर्यंत अनेक कलाकार या पार्टीत सहभागी झाले होते. यावेळी लोकप्रिय अभिनेत्री सना खान हीनेही बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावली होती. सनासोबत तिचा पती अनस सईददेखील होता.

ट्रेंडिंग न्यूज

यादरम्यान अभिनेत्री सना आणि तिच्या पतीचा एक व्हिडीओ समोर आला, ज्यानंतर नेटकरी तिच्या पतीला ट्रोल करू लागले होते. या व्हिडीओमध्ये मुफ्ती अनस पत्नी सनाचा हात खेचत तिला पार्टीतून बाहेर नेताना दिसला होता. आता या व्हायरल व्हिडीओवर अभिनेत्रीने स्पष्टीकरण दिले आहे.

Iftar Party:प्रेग्नंट सना खानसोबत पतीचे विचित्र वागणे, बाबा सिद्दीकीच्या पार्टीतील व्हिडीओ चर्चेत

बाबा सिद्दीकी दरवर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन करतात. दरवर्षीप्रमाणेच यावेळीही त्यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी अनेक स्टार्स तिथे पोहोचले होते. एकेकाळी टीव्ही इंडस्ट्री गाजवणारी अभिनेत्री सना खानही या पार्टीत सहभागी झाली होती. सध्या सना गर्भवती असून, ती बुरखा घालून या इफ्तार पार्टीत पोहोचली होती. यादरम्यान तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत होता. मात्र, यादरम्यान एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात मुफ्ती अनस सनाचा हात खेचताना दिसला. गर्भवती पत्नीला अशाप्रकारे खेचल्याबद्दल तिच्या पतीला यूजर्सने प्रचंड ट्रोल केले होते, त्यानंतर आता अभिनेत्रीने याबाबतचे सत्य सांगितले आहे.

सोशल मीडियावर झालेल्या ट्रोलिंगनंतर आता अभिनेत्री यावर स्पष्टीकरण दिले आहे. सना खान म्हणाली की, ‘मला माहित आहे की, हा व्हिडीओ पाहून अनेकांना विचित्र वाटलं असेल. पण, असं काही नाही. त्यावेळी आम्ही पार्टीतून बाहेर पडत होतो आणि आमचा आमच्या चालकाशी संपर्क होत नव्हता. गाडीचाही पत्ता नव्हता. आम्ही बराच वेळ वाट पाहिली. बराच वेळ उभं राहून आम्ही थकलो होतो. त्यावेळी मी देखील खूप अस्वस्थ झाले होते. त्यामुळे ते मला एखाद्या आरामदायी ठिकाणी घेऊन जात होते, जिथे मी पाणी पिऊ शकेन आणि मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकेन. त्यावेळी पापाराझींमुळे आम्हाला फार उशीर होऊ नये यासाठी मीच त्यांना घाई करायला सांगत होते.’

IPL_Entry_Point

विभाग