रमजानचा पवित्र महिना सुरू झाला की दरवर्षी बाबा सिद्दीकी आणि झीशान सिद्दीकी यांची इफ्तार पार्टी चर्चेचा विषय ठरते. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक कलाकार हजेरी लावतात. सध्या सोशल मीडियावर या पार्टीमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री सना खान पती मुफ्ती अनससोबत दिसत आहे. मात्र, प्रेग्नंट सनासोबत पतीचे वागणे पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीमधील अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. यामधील एका व्हिडीओमध्ये फोटोग्राफर्ससमोर सनाचा पती अनस तिला खेचत घेऊन जाताना दिसत आहे. सना कॅमेरासमोर त्याला हळू चालण्याची विनंती करते. तसेच ती थकली असल्याचे देखील सांगते. मात्र तरीही अनस सनाला खेचत त्या पार्टीमध्ये घेऊन जातो.
वाचा: ‘कच्चा बदाम’ गर्ल अंजली अरोराला चाहत्याने विमानतळावर केलं प्रपोज! व्हिडीओ व्हायरल
सध्या सोशल मीडियावर सना खान आणि तिचा पती मुफ्ती अनसचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी अनसला या व्हिडीओतील वागणूकीवरुन सुनावले आहे. एका यूजरने 'खरच? आरामात जरा.. तुझी पत्नी आहे ती' असे म्हटले आहे. त्यानंतर दुसऱ्या एका यूजरने, 'अरे तिला श्वास तर घेऊन दे' असे म्हणत अनसला ट्रोल केले आहे.
बाबा सिद्दिकी आणि झीशान सिद्दीक यांची दरवर्षी होणारी इफ्तार पार्टी एखाद्या मोठ्या इव्हेंट पेक्षा कमी नसते. दरवर्षी होणाऱ्या या मध्ये पार्टी ठिकाणी भारतातील सर्वात मोठ्या सुपरस्टार्स पासून अनेक दिग्गज या पार्टी चे साक्षीदार असतात. हा एक उत्सव आहे ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाही पार्टी देखील थाटामाटात पार पडली.