
Tu Chal Pudha Latets Update: ‘तू चाल पुढं’ या मालिकेत आता एक नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. एकीकडे ‘मिसेस इंडिया’ या स्पर्धेत उपविजेती ठरून अश्विनीने सगळ्यांचीच मने जिंकून घेतली आहेत. अनेक अडथळे पार करून ‘मिसेस इंडिया’ स्पर्धेची उपविजेती ठरलेल्या अश्विनीचं दणक्यात स्वागत झालं आहे. तर, वाघमारे कुटुंबाने देखील अश्विनीचा नव्याने गृहप्रवेश केला. सगळ्यांनाच अश्विनीचा अभिमान वाटत आहे. मात्र, त्यांचा हा आनंद पाहून शिल्पीचा मात्र जळफळाट होत आहे. अश्विनीला त्रास देण्यासाठी आता शिल्पी आता नवनवीन योजना आखत आहे.
अश्विनीला आनंदात बघणे शिल्पीला कधीच आवडत नाही. त्यामुळे आता अश्विनीला पुन्हा कसं अडचणीत आणता येईल याची योजना शिल्पी आखत आहे. यासाठी आता शिल्पी स्वतःच्या मुलाचाच वापर करणार आहे. अश्विनीला त्रास देण्यासाठी शिल्पी आता संजूचा वापर करणार आहे. संजू हा शिल्पी आणि विद्युत यांचा मुलगा आहे. अश्विनीला ‘मिसेस इंडिया’ या स्पर्धेत हरवण्यासाठी शिल्पीने विद्युतचा मित्र विक्रम याची साथ घेतली होती. या बदल्यात तिने विद्युतची साथ सोडून विक्रमसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.
आता विद्युत आणि शिल्पी याचा घटस्फोट होणार असून, ती संजूला त्रास देऊन अश्विनीला मात्र देण्याचा प्रयत्न करणार आहे. अश्विनी आपल्या दोन्ही अर्थात मयुरी आणि कुहू यांच्याप्रमाणेच संजूची देखील काळजी घेते. ती स्वतःच्या पोटच्या मुलाप्रमाणे संजूची देखभाल करते. आता संजूला त्रास दिला तरच अश्विनीला त्रास होईल, हे लक्षात घेऊन मुद्दाम शिल्पी संजूला त्रास देते. ज्या संजूच नाव घेऊन शिल्पीने वाघमारेंच्या घरात एन्ट्री घेतली आहे, त्याच संजूचा वापर करून शिल्पी अश्विनीला त्रास देणार आहे.
अश्विनी स्पर्धेत उतरू नये आणि उतरलीच तर, ती जिंकू नये यासाठी शिल्पीने अनेक प्रयत्न केले. मात्र, तिचे सगळेच डाव नेहमी फोल ठरले. प्रत्येक वेळी आपल्या पत्नीची म्हणजेच अश्विनीची साथ न देता, श्रेयसने नेहमीच आपल्या बहिणीची शिल्पीची बाजू घेतली. याचाच फायदा शिल्पीने घेतला होता. तिने नेहमीच श्रेयसचा वापर करून अश्विनीला अडकवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता शिल्पीचा खरा चेहरा श्रेयसच्या समोर आला आहे. त्यामुळे त्याने आता अश्विनीची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित बातम्या
