मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ajit pawar mother: “माझ्या हयातीतच अजितनं मुख्यमंत्री व्हावं”, अजित पवारांच्या मातोश्रींनी व्यक्त केली इच्छा

ajit pawar mother: “माझ्या हयातीतच अजितनं मुख्यमंत्री व्हावं”, अजित पवारांच्या मातोश्रींनी व्यक्त केली इच्छा

Nov 05, 2023 09:56 AM IST

Gram Panchayat Elections 2023: राज्यात आज ग्रामपंचायत निंवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मतदान होत आहे. अजित पवार यांच्या मातोश्री यांनी देखील मतदान केंद्रावर येत मतदानाचा हक्क बजावला.

Gram Panchayat Elections 2023
Gram Panchayat Elections 2023

Gram Panchayat Elections 2023: राज्यात आज तब्बल २ हजार ३९६ ग्रामपंच्यातिच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. आज सकाळी ७.३० पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. पुण्यात देखील बारामती तालुक्यातील काही ग्रामपंच्यातीसाठी मतदान होत आहे. आज उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री यांनी देखील काटेवाडी येथील मतदान केंद्रात येऊन मततानाचा हक्क बजावला.

ट्रेंडिंग न्यूज

Gram Panchayat Elections 2023: राज्यात आज २ हजार ३६९ ग्रामपंचायतींसाठी मतदान; अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

राज्यात आज ग्रामपंच्यात निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. अनेक दिग्गज व्यक्तिची प्रतिष्ठा या निवडणुकीत लागणार आहे. राज्यात नागपूर, बीड, पुणे, हिंगोली आदि जिल्ह्यात निवडणुका आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी देखील काटेवाडी येथील मतदान केंद्रावर येत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी माध्यमांनी अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांनी त्यांच्या हयातीत मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा माध्यमांपुढे व्यक्त केली.

Mumbai Local Mega block: मुंबई करांनो आज बाहेर पडतांना लोकलचं वेळापत्रक तपासा; आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

आशाताई पवार म्हणाल्या, “अजित पवार हे सध्या आजारी आहे. आजारपणामुळे त्यांना अशक्तपणा आला असून यामुळे ते मतदानाला येऊ शकले नाहीत. १९५७ पासून मी मतदान करत असून पूर्वी सुरुवातीला काटेवाडीत काहीच नव्हतं. पण माझ्या सुनेमुळे काटेवाडीत भरपूर बदल झाले अजितवर लोकांचं प्रेम आहे. पण पुढचं काय सांगता येतं? सर्वांना वाटतं की दादांनीच मुख्यमंत्री व्हावं. माझं वय आता ८६ वर्षे आहे, त्यामुळे माझ्या देखतच अजितने मुख्यमंत्री व्हावे. बारामती आपलीच आहे, लोकांचंही दादांवर प्रेम आहे, त्यामुळे पुढे काय होते ते आता पाहुयात'', असेही त्या म्हणाल्या.

आज २३५३ ग्रामपंचायतींसाठी मतदान

नागपूर जिल्ह्यातील ३६१ ग्राम पंचायतीसाठी मतदान होणार आहे. अमरावती जिल्ह्यात २० ग्रामपंचायतीसाठी आज निवडणूक होणार आहे. येथील एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून १७ ग्रामपंचायतमध्ये पोट निवडणूक होणार आहे. वाशीम जिल्ह्यातील २ भंडारा जिल्ह्यात ६६ , गोंदिया जिल्ह्यात ४, बुलढाणा जिल्ह्यात ४८ ग्राम पंचायतीच्या तर १० ठिकाणी पोटनिवडणुका होत आहेत. वर्ध्यात एकूण ६३ ग्राम पंचायतमध्ये निवडणूक होत आहे. नाशिक जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतपैकी ४५ ग्रामपंचायतसाठी आज मतदान होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात आज १९४ ग्रामपंचायतसाठी निवडणूक होणार आहे. जळगाव जिल्ह्यात १५१, नंदुरबार जिल्ह्यात १६ धुळे जिल्ह्यात २६, लातूर जिल्ह्यात १३, बीड जिल्ह्यात १५८, सोलापूर जिल्ह्यात १०९, धाराशिमध्ये ६ ठिकाणी, हिंगोलीमध्ये ३२, बारामती तालुक्यात ३२, चंद्रपूर जिल्ह्यात ८ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक आहेत.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग