T20 World Cup USA Vs India Cricket Live Scorecard : टी-20 वर्ल्डकप २०२४ चा २५ वा सामना भारत आणि अमेरिका यांच्यात खेळला जात आहे. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर अमेरिकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद केवळ ११० धावा केल्या.
भारताकडून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पहिल्या चेंडूपासूनच अप्रतिम गोलंदाजी करत अमेरिकेच्या फलंदाजांवर दडपण आणले.अर्शदीपने ४ , हार्दिक पांड्याने २ आणि अक्षर पटेलने १ विकेट घेतली.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या अमेरिकेची सुरुवात चांगली झाली नाही आणि पहिल्याच षटकात संघाने २ गडी गमावले. यामुळे संघ दडपणाखाली आला आणि पॉवरप्लेमध्ये त्यांना केवळ १८ धावा करता आल्या.
मात्र, यानंतर स्टीव्हन टेलर आणि नितीश कुमार यांनी चांगली फलंदाजी केल्यामुळे संघाची धावसंख्या १०० च्या पुढे जाऊ शकली. अमेरिकेकडून नितीश कुमारने २३ चेंडूंत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने सर्वाधिक २७ धावा केल्या तर टेलरने ३० चेंडूंत २ षटकारांच्या मदतीने २४ धावा केल्या.
या सामन्यात अर्शदीपने ४ षटकात केवळ ९ धावा देत ४ बळी घेतले.
दरम्यान, भारत आणि सह-यजमान यूएसए हे दोन्ही संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहेत आणि जे दोन संघ हा सामना जिंकतील ते सुपर ८ साठी पात्र ठरतील.
अमेरिका- स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर, अँड्रिस गौस (विकेटकीपर), आरोन जोन्स (कर्णधार), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रावलकर, अली खान
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीप), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
संबंधित बातम्या